Sunday, June 17, 2007

बस्तकीया




बस्तकीया, दुबईमधला हा एक देखणा परीसर. पारंपारीक वास्तुशास्त्र, पुरातन पद्धतीची घरे, पुर्वापार चालत आलेला अमोल्य ठेवा, संस्कॄती. वारसा, कला जाणीवपुर्वक , कठोर मेहनतीने व प्रामाणिकपणे जोपासण्याचा दुबई सरकारचा स्त्युत प्रयास. या गल्ली, कुचेत रमतगमत फेरफटका मारण्याचा आनंद काही और आहे.
१९०० च्या सुरवातीस बस्तक, दक्षिण ईराण मधुन आलेल्या व्यापारी लोक येथे या परिसरात स्थाईक झाले. त्यांच्या जुन्या घरांचे आता याच परंपरेचे भान राखत जीर्णोद्धार केला गेला आहे

ह्या रखरखत्या ऊन्हात, तप्त वाळवंटात घरात थंडावा रहावा, नैसर्गीकरीत्या वातानुकुलीत रहावे, या विचाराने केलेली ही विंडटॉवर ची रचना वैशिष्टपुर्ण आहे या दुबईमधे शैख झहीद रोड वर अचंबा वाटतील असे गगनाला स्पर्श करणारे टॉवर्स उभे केले आहेत त्याच बरोबर हेरीटेज साईट्स ही नुसत्याच जपल्या गेलेल्या नसुन त्याची उत्तमप्रतीची देखरेखही होत आहे.

नाहीतर आपल्या कडे जे जे जुने आहे ते ते नष्ट करा. या पाश्वभुमीवर आपल्या पुण्यातील ऐतीहासीक वाडे जमीनदोस्त करुन तेथे विद्रुप ईमारती उभारण्याचे प्रयत्न पाहीले की वाईट वाटते.

No comments: