Sunday, June 17, 2007

सौ. मंजुषा कुलकर्णी-पाटील

सौ. मंजुषा कुलकर्णी-पाटील या आजच्या तरुण पिढीतील एक अत्यंत प्रतिभाशाली, गुणवंत गायिका. या सर्व कलावंताचे स्वर्गीय गाणे ऐकताना मधेच कधीतरी एक असा क्षण येतो की आपण क्षणस्थ होवुन जातो, मन शांत होत जाते, याच साठी केवळ याच अनुभुतीसाठी ऋषीमुनी रानात तप करायला जात असावेत का?



आजच्या मैफीलीची सुरवात त्यांनी धनश्री रागाने सुरु केली, त्यानंतर गौरी व सोहोनी गायल्यानंतर त्या लोकाग्राहस्तव ठुमरी व शेवटी दादरा गायल्या. नाट्यसंगीत गाणे ही तर त्यांची खासीयत, पण ते काही आज ऐकायला मिळाले नाही. तबल्याबर त्यांना साथ केली ती पं. विभव नागेशकरांनी.
आपल्या आक्रमक गायकीने सौ. मंजुषा कुलकर्णी-पाटील नेहमीच ऐकणाऱ्यांना मंत्रमुग्ध व प्रभावीत करत आल्या आहेत. त्या गाताना नेहमीच श्रोत्यांबरोबर स्वःताही गाण्याचा आनंद उपभोगत असतात असे मला वाटते. कार्यक्रम संपल्यानंतर कलावंताच्या चेहऱ्यावरचे तुप्तीचे भाव काही औरच असतात नाही का.
साजन मिलाप या संस्थेतर्फे त्याच्या हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचा गाण्याचा कार्यक्रम, भारतीय विद्यार्थी भवन,चौपाटी, मधे झाला.

1 comment:

A woman from India said...

"त्या गाताना नेहमीच श्रोत्यांबरोबर स्वःताही गाण्याचा आनंद उपभोगत असतात असे मला वाटते. कार्यक्रम संपल्यानंतर कलावंताच्या चेहऱ्यावरचे तुप्तीचे भाव काही औरच असतात नाही का."
हा अभिप्राय फार छान आहे. कलाकाराला स्वतःला आनंद मिळत असेल तरच श्रोत्यांना आनंद मिळू शकतो. कारण काय असेल ते असो, बरेचदा कलाकार हा आनंद चेहेर्‍यावर दिसू देत नाही. काही काही कलाकार तर अगदीच निर्विकारपणे गातात/वाजवतात. पण मंजुषा कुठलीही भीड नं बाळगता स्वाभाविक हालचाली आणि भाव प्रकट करताहेत हे बघून छान वाटलं.