Friday, June 15, 2007

हे जग म्हणजे सर्वात मोठा रंगमंच आहे रे



वेताळाचे स्वगत सुरु झाले " विक्रमाआआ हे जग म्हणजे सर्वात मोठा रंगमंच आहे रे ! यह जीवन एक नाट्य आहे, आपण सारे कलावंत केवळ कठपुतळी रे कठपुतली, सुत्रधार कोइ और है रे ॥" ( अगदी आनंद मधल्या राजेश खन्ना टाईप)

विक्रम नेहमी प्रमाणे आपला बुचकळ्यात पडला. ह्या वेताळाला झालय तरी काय ? काल परवा पर्यंत तर बरा होता. आज अचानक याच्या अंगात नट कुठुन संचारला ? काही उमजेना. आपले मौनव्रत बरे. कळेल थोडया अवधीने.

अरे विक्रमा तुझ्या राज्यात हे काय चाललय ? तुझे राज्यकारभारात लक्ष्य आहे का नाही ? तुझ्या राज्यात मराठी नाटकांना आपली हक्काची जागा पाहीजे होती ती आता मिळाली ना मग ती सर्वांनी व्यवस्थीत वाटुन घ्यायची. व्यवसाईक , समांतर, बालरंगभुमी गुण्यागोविद्याने एकत्र नांदावेत, या सर्वांनी मिळुन रसीकांचे मन रिझवावे तर मधेच हे बेसुर सुर कुठुन येवु लागले ?
विक्रमा, समांतर रंगकर्मी, बालरंगभुमीवाले केवळ पाचच गाव मागताहेत रे ! त्यांना सबंध साम्राज्य नको आहे रे ! केवळ आपल्या हक्काचा रंगमंच त्यांना हवाय. सुईच्या अग्रावर रहाणारी ही जागा ती पण बिल्डर्सना भाडयाने ? का ? कशासाठी ? आणि या साठी ऋषीतुल्य दामु केंकरेंना आज आपल्या हाती सुदर्शनचक्र घ्यावे लागले ? विजय तेंडुलकर, लालन सारंग, डॉ. जब्बार पटेल, सुलभा देशपांडे, अरुण साधु, रत्नाकर मतकरी, वामन केंद्रे, सुभाष भेंडे, अलेक पदमसी, नदीर बब्बर, फिरोझ खान, राकेश बेदी, दिनेश ठाकुर, माधव वझे, सुरेश खरे, अरुण काकडे, विनय आपटे, शफायत खान, मीना नाईक, कमलाकर नाडकर्णी, प्रेमानंद गज्वी, कोणाकोणाची नावे घेवु , या सर्व मातबगार, जेष्ठ आणि श्रेष्ठ मंडळींना भर रस्तात उतरावे लागले ? लानत है तुमपर और तुझ्या राज्यातील समस्त नाट्यरसींकावर. जरा जनाची नाही निदान मनाची तरी. प्रतिनिषेध कसले करता ? वेताळाचा आवाज चढु लागला.

वेताळा शांत हो ,अट्टहास करु नकोस, आम्ही अद्यायावत असा वातानुकुलीत रंगंमंच उभारु असे आज मी तुला आश्वासन देतो.

विक्रमा तु बोललास आणि हा मी चाललो पळुन रंगमंचावर भाषण करायला.

No comments: