Thursday, June 07, 2007

यु तो हर शाम उम्मीदोमे गुज़र जाती थी । आज कुछ बात है जो शाम पे रोना आया ॥

गज़ल के दो नाम है. एक गज़ल और दुसरा बेगम अख्तर. ईंतजारी, बेकारारी, दऱबदर को तो आखिर ख़त्म होना ही था. हमे तो अपने होशोहवास तो खोना हि था. दो घंटो ईंतजार करवाया रोशनीने लौट आने के वास्ते. आणि त्यानंतर नांदेडवरुन खास आलेल्या श्री. शास्त्री यांनी बेगम अख्तर नी महफिल मधे गायलेल्या गजला, ठुमरी, दादरा याचे ध्वनीमुद्रण ऐकवले, तोबा तोबा, कयामत ही कयामत.




श्री. शास्त्री यांनी हा कार्यक्रम मस्तपैकी सादर केला. बेगम अख्तर यांच्या जीवनाविषयी, गायकी विषयी फार मोलाची माहीती त्यांनी सांगीतली, आयुष्यभर बेगम अख्तर गज़ल गात राहील्या , आपल्या तब्बेतीकडे दुर्लक्ष करत तबीयतीनी गात राहील्या, आख़ीर मौत सुद्धा त्यांना गज़ला गातांना आली, अहमदाबाद मधे शेवटची गज़ल गाता गाता छातीत एक जबरदस्त कळ आली, गाणे कसेबसे पुरे केले, रात्री दोन वाजता त्यांना हॉस्पीटल मधे नेले, तीन दिवसाच्या अपयेशी झुंजीनंतर त्या अल्लाला प्याऱ्या झाल्या आणि गजल पोरकी झाली. गजल नी आता गायचे कोण्याच्या ह्रुदयातुन ? बॅलीस्टर अब्बासी यांच्याशी निकाह झाल्यानंतर जवळजवळ सात बर्षे त्यांना त्यांच्या पतीने व पतीच्या घरच्याने गाण्याची बंदी केली होती, त्यातच त्यांचे गरोदरपणात मुल गेले, आईचे निधन झाले, खचुन गेलेल्या अख्तरीबाईंची दया येवुन अखेर त्यांच्या पतीने त्यांना गाण्याची परवानगी दिली. खर म्हणजे त्याच अब्बासींच्या मागे लग्नासाठी लागल्या होत्या, त्यासाठी आपले गाणे पण सोडायला तया होत्या. अब्बासी तयार नव्हते . एके दिवशी अब्बासींनी मैफीलीत अख्तरी फैझाबादींना " कोयलीया मत करो कलेज़वा लागी कट्यार " गातांना ऐकले , मग काय ? कट्यार काळजात घुसली. अख्तरी फैझाबादी मग बेगम अख्तर झाल्या.

अख्तरी फैझाबादींनी गजल रंगमंचाबर गज़ल गाण्याची संधी अकस्मात मिळाली. त्या शास्त्रीय संगीत शिकत होत्या, पण त्यात त्यांचे मन नव्ह्ते, त्यांची जान अडकली होती ती गज़लेत. कलकत्तामधे एका कार्यक्रमात मुख्य कलावंत येण्यास फार विलंब झाला होता, चिडलेल्या श्रोत्यांना शांत करण्यासाठी संयोजकांनी अख्तरी फैझाबादींना रंगमंचावर धाडले, रागरंग ओळखुन त्यांनी ख्याल गाण्या ऐवजी सरळ गज़ल गाण्यास सुरवात केली , ऐकणारे बेभान झाले असे कधीही ऐकले नव्हते, फर्माइशी वर फर्माइशी होवु लागल्या , पहील्याच कार्यक्रमात त्यांनी जग काबीज केले.

दोन तास वीज गेलेली होती, साडेसहा वाजता सुरु होणारा कायक्रम जवळजवळ साडे आठ , पावणे नऊ वाजता सुरु झाला. पण बेगम अख्तर ना ऐकायल्या आलेल्यांपैकी कोणीही मागे हटले नाही, दोन तास बिजलीची प्रतीक्षा करीत सर्व जण शांतपणे खाली प्रांगणात ताटकळत उभे होते, धन्य त्या बेगम अख्तर व धन्य ते श्रोते. महफिलाचा शेवट अख्तर बाईंनी गायलेल्या भैरवीनी झाला.

०६/०६/०७ रोजी पु.ल.देशपांडे महाराष्ट कला अकादमीच्या "स्वरालय" उपक्रमत सायंकाळी ६.३० वाजता बेगम अख्तर याच्या खुल्या मैफिलीचे ध्वनीमुद्रण ऐकवले गेले. Thanks to Indian Records collector's Society.
रात्री बाराच्या सुमारास घरी पोहोचलो. बायकोनी मौनराग ऐकवला, साथीला ताल धरायला भांडी संगीत होतेच.

जब हुआ ज़िक्र ज़माने मे मुहब्ब्तका "शकील"
मुझको अपने दिले नाकाम पे रोना आया.

3 comments:

A woman from India said...

लाजवाब!

रवि रतलामी said...

"...गज़ल के दो नाम है. एक गज़ल और दुसरा बेगम अख्तर...."

सही कहा आपने!

A woman from India said...

One problem I am facing ever since you started eSnips is that sound track mixes with the sound track of the video. How do I stop esNip sound track?