Wednesday, March 09, 2022

थारु मुखी भांडार

 राम राम भाऊ.

वडी साई, ही राजाभाऊंची नविन भानगड काय आहे ? राजाभाऊंचे हे सिंधी प्रकरण दिवसेंदिवस वाढतच चालेले आहे. वो तो चणीया हो गया रे भाऊ.

गाढ झोपलेल्या राजाभाऊंच्या तोंडावर पाणी मारुन बिरबलाने त्यांना विचारले "बोल कोणचा पॅटीस सर्वात चांगला असतो, बोल कोणाचा हलवा सर्वात चवदार असतो ?" तर झोपेतुन खाडकन उठवले गेलेले राजाभाऊ एकच जबाब देतील. "थारु  "

परवाच्याला खारच्या "थारु  मुखी भांडार " मधे जावुन देखील काहीच न खाल्याचे दुःख राजाभाऊंच्याने सहन होईना.  मग ते आज संध्याकाळी येथे जावुन धडकले.

शुद्ध तुपात तळलेले, आत चणा डाळ भरलेले  क्रिस्पी पॅटीस, वरचे आवरण छानसे तांबुस झालेले आणि सोबत छोले आणि चटणी. हे छोले सोबत नसते तरी चालण्यासारखे आहे. 













मिठाईच्या दुकानात शिरलेल्या आणि त्या साऱ्या पाहून खवळलेल्या राजाभाऊंना कळेना, नक्की आपण पॅटीस नंतर काय खायचयं. हलवा तर खायचाच होता पण त्याच्या नंतर काय ? 

भल्या मोठाल्या जिलेबीचा मोह कसाबसा आवरुन मग त्यांनी म्हैसुर पाक मागितला.

एकंदरीतच सिंधी खाद्यसंस्कृती भावत चाललली आहे.

झुलेलाल की कसम.

No comments: