Tuesday, March 15, 2022

आयुष्यात दोन ठिकाणांची उणीव फार जाणवते.

 उणीव

आयुष्यात दोन ठिकाणांची उणीव फार जाणवते. 

उपहारगृह येतील आणि जातील ही, पण मरीन ड्राइव्ह वरच्या नटराज हॉटेलमधे तळमजल्यावर बाहेरच्या बाजुस असलेल्या "यांकी डुड्ल्स " सारखे दुसरे आईसक्रीम पार्लर परत येणे नाही. 

रात्र चांगली चढत गेली की गाडी काढायची , नटराजच्या कोपऱ्यावर असलेल्या ह्या उघड्यावरच्या ठिकाणी मोकळ्या हवेत, समुद्रावरुन येणाऱ्या वारा अंगावर घेत, तिच्याबरोबर "चिक चॉक " , "कसाटा " खाणे ते ही फक्त दोघांसाठीच असलेल्या झोपाळ्यावर बसुन. गप्पा गोष्टी करत. लग्न नुकतेच झालेले.

कधी झोपाळा रिकामा नसायचा मग आपला झालेला विरस आईसक्रीम खात खात विसरुन जाणॆ. 

खुप मस्त दिवस ते होते.

आणि दुसरी जागा म्हणजे वॉर्डन रोडवरचे " स्नोमॅन्स "

"सॉफ्टी " आईसक्रीम म्हणजे काय असते हे ह्या मुळॆ समजले. चांगले ग्लास भरुन यायचे. त्या काळी जरा नवलाई वाटायची. असचं रात्री कधीतरी गाडी काढायची येथे खायला जायचे. येथल्या माहोलची मजा घेत घेत मस्त पैकी " सॉफ्टी " चाटुन पुसुन खायची. 

कधीतरी हे बंद झाले आणि त्याची जागा "Gelato " आणि "MOD" नी घेतली. आता त्या जागी कधीच्या काळी जाणॆ होते, खास दरात मिळत असल्यामुळे. पण आता बाजारात आलेली नविन नविन कितीही आईसक्रीम खाल्ली तरी "स्नोमॅन" ची चव विसरणे नाही.

0 Comments


No comments: