Monday, March 07, 2022

महाशिवरात्रीच्या उपवासासाठी

 आता महाशिवरात्रीच्या उपवासासाठी फराळी मधे एवढे पदार्थ करणार हे कळल्यावर जर का "शेंगदाण्याचा लाडु नाही का करणार " 

असा प्रश्न जर का राजाभाऊंनी विचारला असता तर आज त्यांना नक्कीच संन्यास घेवुन हिमालयात जाण्याची वेळ आली असती.

शेंगदाण्याचा लाडु खाण्याची झालेली इच्छा मनात दाबुन ठेवली.  अकस्मात दुपारी जेवतांना तो समोर आला. समोर बसलेल्या गृहस्थांच्या डब्यात.

मग काय. 

निर्लज्यम सदा सुखी. 

"आजच सकाळी मला ह्या लाडवाची आठवण झाली होती "

No comments: