Sunday, March 06, 2022

पुरणपोळी


 Suranga Daté 

यांनी राजाभाऊंच्या पुरणपोळी  खाण्यावर एक अप्रतिम कविता केली आहे.

गर्दीतून वाट काढत,

झेन आपल्या नाकाने हुंगत हुंगत

कुठेतरी थांबली ,

आणि "विनायका ! केशवा ! "

अशी ललकारी देत ते बाहेर पडले....

समस्त लाटणाऱ्या सुवासिनिंकडे स्मितहास्य करत

त्यांनी आपली ऑर्डर सांगितली,

आणि एवढ्‍यात,

त्यांच लक्ष

तव्यावरच्या

त्या फुरंगटून बसलेल्या पोळी कडे गेलं...

राजाभाऊंना पोळी वरच्या

गुलाबी छटांनी इतकं मोहित केलं,

ते म्हणाले

"अश्या ललनेला मी प्लास्टिक मध्ये कसे गुंडाळू देईन ?

भारतातील स्त्री चा हा घोर अपमान आहे ....

द्या, आदरपूर्वक द्या मला ,

तुपाचा शिडकाव्यात भिजू दे तिला..."

ह्या नाटकाने तूपही वितळून गेलं ,

आणि

राजाभाऊंनी ती मउसूत पुरणपोळी गिळंकृत केली ...

पलीकडे झेन नी डोक्याला हात मारून घेतला ,

आणि म्हणाली,

"केशवा ! विनायका ! ......"



No comments: