Saturday, July 21, 2007

अए जुना सामान, रद्दी, पेपर, जुना भंगार. अए लोखंड,

अए जुना सामान, रद्दी, पेपर, जुना भंगार. अए लोखंड, घेणार. आरोळी ऐकु आली.

पोऱ्याला घरी बोलावले.सकाळची ताजी, दुपारी रद्दी झालेली, जुनी वर्तमानपत्रे रद्दीत विकण्यासाठी.

तुमच्याकडे वजनाचा काटा आहे का ? त्यानी विचारले ? क्षणभर मी विचारात. मग जाणवले, अरे हे रद्दीवाले "काट्यात " मारतात म्हणुन काहीजण आपला स्वताचा वजनकाटा बाळागतात. म्हणजे बरे . वजनाला चोख. उगाचाच फसायला नको.

दुबईत असताना येथे ही सिस्टीम नाही, जाडजुड वर्तमानपत्रे फेकुन द्यावी लागतात म्हणुन जीव उगाचच हळहळत राहीला होता. बॅगेत ही ढेर सारी रद्दी भरुन मुंबईला विकायला घेवुन जाण्याचेही एकदा मनात आले होते.

1 comment:

Vishal Khapre said...

अगदी कसे मनातले बोललात. आई सध्या अमेरिकेत आली आहे, तीची तर नेहमीच हळहळ होते की वृत्तपत्रे फेकून द्यावी लागतात. रद्दिवाला हा सगळ्यात जास्त आठवतो इथे.

अगदी प्रामाणिक आणि मनकवडी पोस्ट बरे!!!