Sunday, July 08, 2007

जगी हा वेड्याचा पसारा मांडला सारा

ही बातमी आता देवुन काय उपयोग ? कोण कुठली संस्था उठते व पैसे कमवते आणि आपण त्याला बळी पडतो. युनेस्कोने सर्व सपल्यावर ही फरकत घेतली. आता पर्यंत ७ वर्षे ते झोपले होते काय ?

सकाळ मधुन - ताज पे सरताज आणि मोबाईल कंपन्यांचं भाग्य फळफळ
लंनवी दिल्ली, ता.८- जगातील सात आश्‍चर्यांच्या यादीत "ताज" ची निवड झाल्यामुळे अनेकांची हृदये आभिमानाने फुलून असली तरी पण "व्होट फॉर ताज" या जगभरात चालवल्या गेलेल्या मोहिमेवर लोकांच्या भावनांचा आर्थिक लाभ मिळवण्यासाठी दुरूपयोग केल्याची मोठी टीका होत आहे. जागतिक आश्‍चर्यांची देखभाल करण्याचे अधिकृत कर्तव्य असलेल्या युनेस्कोने या मोहिमेपासून फारकत घेत असल्याचे मोठ्या खेदाने जाहीर केले आहे. सदर मोहिमेपासून जागतिक आश्‍चर्यांचे संवर्धन करण्यासाठी ठोस उपाययोजना होणार नसल्यामुळे आपण हा निर्णय घेत असल्याचे सांगितले आहे. ताजची सात आश्‍चर्यात निवड व्हावी म्हणून भारतात इंटरनेट आणि एसएमच्या माध्यमातून मत देण्यासाटी एकच चढाओढ सुरू होती. हिंदी चित्रपटसृष्टीतील तारकांनीही ताजला मत देण्याचे प्रसारमाध्यमातून आवाहन केले होते, या मोहिमेवर टीका करणाऱ्यांनी मात्र जागतिक आश्‍चर्यांची निवड होण्याची प्रक्रिया अधिकृत नसून याप्रयत्नात मोबाईल कंपन्या आणि स्विझर्लंडच्या संस्थेचे यात उखळ पांढरे झाले अशी भावना टीकाकारांनी व्यक्त केली.. या मोहिमेअंतर्गत एअरटेल वगळता सर्व मोबाईल कंपन्यांनी "ताजला मत द्या "असे एसएमएस पाठवण्यासाठी प्रति एसएमएस तीन रुपये दर आकारला होता. यातून जमा झालेल्या निधीतील काही भाग या स्पर्धेच्या आयोजकांबरोबर अथवा ताजचे संवर्धन करणाऱ्या संस्थाना दिला का यावर मोबाईल कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कुठलाही तपशील देण्यास नकार दिला.

1 comment:

A woman from India said...

खरंय, लोकांच्या भावनांचा हा बाजार हल्ली फार बोकाळला आहे. खरं म्हणजे ह्या सर्व प्रकारात काहीही अधिकृतपणा नसल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. तरी प्रसारमाध्यमांनी मुद्दा उचलून धरला. अगदी टाईम्ससारखे वृत्तपत्रंही याला अपवाद नाही. सगळेच पैशाचे पाईक.