Friday, July 06, 2007

महर्षी कर्वे रस्ता



महर्षी कर्वे रस्ता हा दक्षिण मुंबईतुन बाहेर पडण्याचा मुख्य रस्ता. त्याची दुर्दशा दाखवण्याचा हा केवीलवाणा प्रयत्न. चर्चगेट ते मरीन लाईन्स रेल्वे स्थानका दरम्यानचा हा परीसर.


पदपाथ हे पादचाऱ्यांसाठी असतात हा भ्रम.

घाणीचे ढिगारे , काय म्हणाता? कोठे आहेत ? दिसत तर नाहीत ! चश्म्याचा नंबर बदलला आहे वाटते.

या गोव्याकडल्या जाणाऱ्या बसीस, अरे वा, काय बोलता राव ? यांना उभे रहायला जागा नको काय ? पुर्वी आतल्या रस्त्यावर उभ्या असायचा तिकडे त्यांना मनाई केलीत ना ! भोगा आता आपल्या कर्माची फळे.

वाहतुकीस अडथळा ? खरे की काय ? वाटत नाही बुवा. तुम्ही तर चालेले आहेत मजेत, भर सायंकाळी, गर्दीच्या टाईमाला.

आणि या पत्र्याच्या शेडी ? हा भला मोठा रोलर ? काय राव मस्करी करता काय ? रस्त्तांची कामे गेले कित्येक महीने चालली आहेत दिसत नाही का ? डोळे फुटले आहेत वाटते ?

आणि या गाड्‍या ? या रस्तावर उभ्या नाही करायच्या तर काय तुमच्या घरात करायच्या काय ? आणि ही होडी, असुद्या की पावसाळ्यात उपयोगी पडेल.

तुम्ही म्हणजे ना. कोण तुमच्या नादाला लागणार ? आहे ते काय वाईट आहे काय ? तुम्हाला लागलय वेड. त्या सकाळच्या पुणे प्रतिबिंबच्या नादाला लागुन, ते आपले पुणभर हिंडतात कॅमेरे हातात घेवुन , मग त्या मागोमाग तुम्ही येथे मुंबईत हे वेडे चाळे करू लागला आहात.

1 comment:

Shantanu said...

It's been awhile since I checked your blog, and since it is all Marathi now, I can only admire the pictures :)

BTW, my blog URL is now http://www.shantanughosh.com