१५ ऑगष्ट.
बादशहाचे शटर उघडायला राजाभाऊ पोचले. पण अजुन बराच वेळ असल्यामुळॆ खाली पेट वापस.
अब भी एक उम्र पे जीने का न अंदाज आया । ज़िंदगी छोड दे पीछा मेरा, मै बाज़ आया ।।
वाघाला जशी एकदा का रक्त चाखल्यानंतर चटक लागते अगदी तशीच चटक राजाभाऊंना काही वर्षापुर्वी खाल्लेल्या पातोळ्यांची लागली होती. पण काही केल्या त्यांना त्या खायला मिळत नव्हत्या व त्यांची तडफड काही संपतासंपत नव्हती. आणि गंमत म्हणजे ज्या उपहारगृहात ते कैक वेळा गेलेले आहेत त्याच ठिकाणी "पातोळ्या" मिळतात हे त्यांना ठावुकच नव्हते.
कालच्या म.टा. मधे श्री. मुकुंद कुळे यांनी लिहिलेल्या "हळदीच्या वासाच्या पातोळ्या " हा लेखामुळे त्यांना त्या जागेचा ठावठिकाणा लागला. खरं म्हणजे कालच दुपारी त्यांची माटुंग्याच्या "आनंद भवन " मधे "पाटोळ्या " खाण्यास जायचे होते. पण रात्रीच्या उकडीच्या मोदकाच्या मोहापायी ते गप्प बसले.
मग काय , आजचा सकाळाचा बेत. पातोळ्यांचा.
त्या पातोळ्या सोबत राजाभाऊंना आणखी काही तरी खिलवले गेले.
Repost
राजाभाऊंना "पातोळे " खाण्यापुर्वी फोटो काढतांना श्री. हरीदास नायकांनी त्यांना पाहिले.
त्यांच्याजवळ येवुन ते बसले. आणि वेटरला त्या पाटोळ्यावर तुप ओतायला सांगितले.
तुप ओतल्यानंतर मग पाटोळ्याची लज्जत आणखीनच वाढली.
दुसरे " पाटोळे " जेव्हा त्यांनी मागवले तेव्हा त्या हुशार वेटरला परत काही सांगावे लागले नाही. स्वःताहुन त्याचे तुपाचे काम करुन टाकले.
त्यामुळे ह्या आता तुपाने थबथबलेल्या पातोळ्या.
All finished.
पातोळ्या खाण्याच्या नादात श्री. हरिदास नायक त्यांना ह्या त्यांच्या पद्धतीच्या अळुवडी बद्दल जे सांगत होते त्याच्याकडे राजाभाऊंचे लक्ष नव्हते.
ह्याचे काय काय करतात, कसे खायचे, कश्याबरोबर खायचे , हे त्यांच्या भेज्यात शिरलेच नाही.
आता ह्या अळुवडी साठी परत एकदा जाणे होणे आहे.
श्री. हरिदास नायक म्हणाले "तुमच्या पोटात आणखी जरासी जागा असेल तर मी एक पदार्थ तुम्हाला सुचवु का ? तो खावुन पहा "
राजाभाऊ त्यांना नकार देवुच शकले नाही. एखाद्याचे मन मोडणे योग्य नव्हे.
शेवया आणि दाल . हे दोन पदार्थ एकत्रितपणे असे प्रथमच खाल्ले.
बनावं लागते, कधी कधी निर्लज्य बनावं लागते.
मग अगदी ते प्रसादाचे जेवण जेवणे का असेना. आपल्याला आवडले ना, भावले ना, मग झालं, प्रसादाचे जेवण हे प्रसादासारखेच खावे असे थोडेच कोणी लिहुन ठेवले आहे ?
अत्यंत चविष्ट भोजन. गरमागरम भोजन. अळुचे फदफदे, वटाण्याची खिचडी आणि प्रसादाचा दलीया. अप्रतिम जेवण आणि ते ही आवर्जुन आग्रहाचे आमंत्रण देवुन, आपुलकीने आत बोलवुन.
मग काय राजाभाऊंनी जो आडवा हात मारला बस की बसं. सर्व पदार्थ मागुन मागुन ते मन तृप्त होईपर्यंत जेवले.
वेळ दुपारची एक वाजुन अट्ठावन्न मिनिटे. भोजनशाला बंद व्हायला केवळ दोन मिनिटे राहिलेली. त्या अन्नछत्रची पाटी राजाभाऊंनी पाहिली, वेळ पाहिली आणि ते धावत सुटले वेळॆच्या आत पोचायला, कायदा कडक असला तर ?
राजाभाऊंना अगदी आश्चर्याचा धक्का बसला. चक्क त्यांच्यासाठी व त्यांच्याबरोबरच्या रांगेत उभे असणाऱ्यांसाठी त्यांनी भोजनगृह चक्क उघडे ठेवले. पोचेपोचेपर्यंत अडीच वाजलेले.
श्री. आगलावे.
श्री चिंतामणी चॅरिटेबल ट्रस्ट.
श्री क्षेत्र थेऊर.
दुरध्वनी क्रं. ०२० २६९१४७३९
अन्नादाता सुखी भव.
REPOST
" लोकप्रभा" मधला खाण्यावरचा लेख राजाभाऊंनी वाचला आणि त्यांना अगदी प्रकर्षाने जाणवले, आपण कितीतरी महिने झाले , शिवाजी पार्क वरच्या "आस्वाद " मधे पोळाउसळ खायला गेलेलो नाही.
मग काय. शनिवार सकाळ.
पण दुर्दैव त्यांचे. "आस्वाद" मधे नेहमी प्रमाणेच अफाट गर्दी. मग राजाभाऊ नेहमी प्रमाणॆच "आस्वाद" बाहेरील गर्दी बघुन जसे पुढे "प्रकाश" कडे वळतात तसेच शनिवारीही "प्रकाश" मधे पोचले.
जेवणाची वेळ झालेली. पुरी भाजी वर समाधान मानावे लागले आणि सोबत आपली जराशीच, काळेकाकुंना साथ देण्यासाठी खाल्लेली दही मिसळ आणि खरवस.
रविवार संध्याकाळ.
मालाडला एका समारंभास गेलेले राजाभाऊ अचानक हॉलमधुन गायब झाले. सगळे विचारात. हा विक्षिप्त प्राणी गेला तरी कुठे ?
पण काळेकाकु, त्या मात्र निवांत होत्या. त्यांना पक्क ठावुक.
चुकला फकीर मस्जीद मधे सापडणार.
आता नेहमीच काळेकाकांना घराबाहेर पडल्यापडल्या भुक लागते त्याला ते तरी काय करणार त्यात परत मालाड म्हणजे "गोपाल कृष्ण " हे समीकरण त्यांच्या डोक्यात पार फिट्ट बसलेले.
आधी भुकेने पेटलेला अग्नी अधिकच प्रज्वलीत करण्यासाठी एक ग्लास गरमागरम, तिखट तिखट रसम, नंतर कडक ऑनियन रवा डोसा आणि लालसेपोटी रिचवलेला मस्त मऊसुत नीर डोसा.
repost
Old post. I believe Madhavasharam is closed now.
आज संकष्टी.
भल्या सकाळी राजाभाऊंनी माधवाश्रमात जावुन खातरजमा केली. आज अमर्यादित उकडीच्या मोदकासहीत जेवण आहे ना आणि किती वाजता आहे.
रात्री आठ वाजता
उदरभरण नोहे जाणिजे हे यज्ञकर्म.
भोजनप्रिय " प्रियदर्शन" चा आज या संकष्टीच्या दिवशी आंतरात्मा तृप्त झाला. परमतृप्ती.
ज्या दिलखुलास हास्यानी श्री.महाजनांनी माधवाश्रमात प्रवेश करतांना राजाभाऊंचे आणि काळॆकाकुंचे स्वागत केले तेव्हाच राजाभाऊंना कळुन चुकले आपल्यापुढे काय ताट वाढुन ठेवले आहे ते.
एक, दोन, तीन, चार ........... राजाभाऊंनी पुढे गणती करणे बंदच करुन टाकली. उगीच कशाला जीवाला त्रास.
श्री. महाजनांनी प्रेमाने आग्रह करत , करत त्यांच्या पानात उकडीचे मोदक वाढावे आणि राजाभाऊंनी परमप्रिय मोदक त्याच प्रेमाने ते आपल्या मुखी ग्रहण करावे.
ना वाढणारे थकत होते ना खाणारे.
आज कितीतरी दिवसाने मनासारखे जेवण मिळाले.
मसालेभात, वरणभात, बटाट्याची सुकी भाजी, वटाण्याची भाजी, आमटी, चटणी, लोणचे, कोशिंबीर, पापड , बटाट्याची गरमागरम भजी आणि ताक.
अन्नदाता सुखी भव.
आता वेध पुढच्या संकष्टीचे.
उत्तम , सुग्रास आणि चविष्ट भोजन.
माधवाश्रम.
Repost. I believe it' closed now.
वाढु का ? वाढु का ? तुम्ही किती खाणार ? हा प्रकारच ह्यांना ठावुक नाही.
येथे सरळ आग्रह करुन करुन पानात उकडीचे मोदक वाढले जातात.
अगदी पंचपक्वानाचे ताट समोर आले तरी माणासाचे समाधान म्हणुन नसते.
आता केवळ काकूंचा ओरडा नको म्हणुन काळेकाका गप्प बसले खरे , पण ज्याच्या नशीबी जे खाण्याची तीव्र इच्छा झालेली असते ते त्याला मिळाल्याशिवाय कधी रहात नाही.
काकूंनी या आनंदाच्या प्रसंगी उकडीचे मोदक करावेसे राजाभाऊंना खुप वाटत होते. पण कोणत्या तोंडानी सांगणार , त्यापेक्षा गप्प बसलेले बरे.
युवराजांचा मित्र जेव्हा हातात एक डबा घेवुन आलेला पाहिला तेव्हा राजाभाऊंनी खुषीने नाचायचे तेवढे बाकी ठेवले होते.
लाजेखातीर इतरांना खाण्यासाठी तीन शिल्लक ठेवलेले उकडीचे मोदक.
आजच्या खाद्यभ्रमंतीचा शेवट अखेरीस " आइका" मधे झाला, "मॅश पोटॅटो खावुन.
बाकीचे सारे शाकाहारी पदार्थ संपले होते.
ओशो म्हणतात "मी असं म्हणत नाही की व्यसन वाईट आहे. मी व्यसन सोडा असे सांगत नाही. वाईट आहे ती सवय. मी सांगतो सवय सोडा"
आयुष्यभर राजाभाऊ उडप्यांच्या उपहारगृहात "ओनीयन रवा डोसा व नीर डोसा" खात आले. आवडतात म्हणुन. दुसऱ्या कोणत्याही खाद्यपदार्थाकडे ते पहातही नसत. (इडली हाऊसचा अपवाद वगळता ).
पण गेले तीन दिवस त्यांचे मतपरिवर्तन झाले आहे. त्यांनी आपली सवय सोडली.
आज "राम आश्रय" मधे राजाभाऊंनी "घी पोडी डोसा" खाल्ला, चव छान होती.
परत एकदा "राम आश्रय".