Friday, August 26, 2022

श्री चिंतामणी चॅरिटेबल ट्रस्ट. श्री क्षेत्र थेऊर.

 बनावं लागते, कधी कधी निर्लज्य बनावं लागते. 

मग अगदी ते प्रसादाचे जेवण जेवणे का असेना.  आपल्याला आवडले ना, भावले ना, मग झालं, प्रसादाचे जेवण हे प्रसादासारखेच खावे असे थोडेच कोणी लिहुन ठेवले आहे ?  

अत्यंत चविष्ट भोजन. गरमागरम भोजन. अळुचे फदफदे, वटाण्याची खिचडी आणि प्रसादाचा दलीया. अप्रतिम जेवण आणि ते ही आवर्जुन आग्रहाचे आमंत्रण देवुन, आपुलकीने आत बोलवुन.

मग काय राजाभाऊंनी जो आडवा हात मारला बस की बसं. सर्व पदार्थ मागुन मागुन ते मन तृप्त होईपर्यंत जेवले.

वेळ दुपारची एक वाजुन अट्ठावन्न मिनिटे. भोजनशाला बंद व्हायला केवळ दोन मिनिटे राहिलेली. त्या अन्नछत्रची पाटी राजाभाऊंनी पाहिली, वेळ पाहिली आणि ते धावत सुटले वेळॆच्या आत पोचायला, कायदा कडक असला तर ?  

राजाभाऊंना अगदी आश्चर्याचा धक्का बसला. चक्क त्यांच्यासाठी व त्यांच्याबरोबरच्या रांगेत उभे असणाऱ्यांसाठी त्यांनी भोजनगृह चक्क उघडे ठेवले. पोचेपोचेपर्यंत अडीच वाजलेले. 

श्री. आगलावे.

श्री चिंतामणी चॅरिटेबल ट्रस्ट. 

श्री क्षेत्र थेऊर. 

दुरध्वनी क्रं. ०२० २६९१४७३९

अन्नादाता सुखी भव.


REPOST

No comments: