Friday, August 26, 2022

माधवाश्रम

Old post. I believe Madhavasharam is closed now.

 आज संकष्टी.

 भल्या सकाळी राजाभाऊंनी माधवाश्रमात जावुन खातरजमा केली. आज अमर्यादित उकडीच्या मोदकासहीत जेवण आहे ना आणि किती वाजता आहे.

रात्री आठ वाजता

उदरभरण नोहे जाणिजे हे यज्ञकर्म.

भोजनप्रिय " प्रियदर्शन" चा आज या संकष्टीच्या दिवशी आंतरात्मा तृप्त झाला. परमतृप्ती. 

ज्या दिलखुलास हास्यानी श्री.महाजनांनी  माधवाश्रमात प्रवेश करतांना राजाभाऊंचे आणि काळॆकाकुंचे स्वागत केले तेव्हाच राजाभाऊंना कळुन चुकले आपल्यापुढे काय ताट वाढुन ठेवले आहे ते.

एक, दोन, तीन, चार ........... राजाभाऊंनी पुढे गणती करणे बंदच करुन टाकली. उगीच कशाला जीवाला त्रास.

श्री. महाजनांनी प्रेमाने आग्रह करत , करत त्यांच्या पानात उकडीचे मोदक वाढावे आणि राजाभाऊंनी परमप्रिय मोदक त्याच प्रेमाने ते आपल्या मुखी ग्रहण करावे. 

ना वाढणारे थकत होते ना खाणारे.

आज कितीतरी दिवसाने मनासारखे जेवण मिळाले. 

मसालेभात, वरणभात, बटाट्‍याची सुकी भाजी, वटाण्याची भाजी, आमटी, चटणी, लोणचे, कोशिंबीर, पापड , बटाट्‍याची गरमागरम भजी आणि ताक.

अन्नदाता सुखी भव. 

आता वेध पुढच्या संकष्टीचे.

उत्तम , सुग्रास आणि चविष्ट भोजन.  















No comments: