Thursday, September 08, 2022

दि फ्रेंडस युनियन जोशी क्लब

 ह्या जगमगाटी, दिखावु, चमचमीत, मसालेदार दुनियेत अजुन पर्यंत काहे भोजनगृह आपले साधेपण टिकवुन आहेत आणि म्हणुनच ते साध्या सरळ स्वभावाच्या राजाभाऊंना प्रिय आहेत. 

गेले कित्येक महिने या "दि फ्रेंडस युनियन जोशी  क्लब" मधे गुजराथी थाळे जेवायला जाण्याचे राजाभाऊंच्या फार मनात होतं पण ही साधी इच्छा काही पुर्ण होता होत नव्हती. तो योग काल जुळुन आला. गाडी घेवुन या अफाट गर्दीच्या काळबादेबी विभागात शिरायचे कसे. ती कुठे उभी करायची या साऱ्या अडचणी त्यापुढे शुल्लक. 

साधे आणि रुचकर भोजन. मसालेदार, तिखटदार नसलेले, थाळीत उगीचच अनेक पदार्थांचा फाफटपसारा नसलेले खरे खुरे गुजराती पध्दतीचे जेवण.  हल्लीच्या या दिखावु दुनियेत गुजराती, गुजराती,  गुजराती  करत सरळसरळ पंजाबी पदार्थ सर्रास घुसळवुन दिले जातात, आपण नक्की काय जेवतो आहे हे कळेनासे होते.









कॅफे भारत

 गरमागरम मस्त बटाटावडा खाल्यानंतर मग त्यावर छानसा चहा हवाच. चहाचे नाव काढले आणि राजाभाऊंच्या मनात आपले शासकिय विधी महाविद्यालयातील दिवस आठवले.

परीक्षेच्यावेळी अभ्यासिकेत काढलेले दिवस केवळ याच चहाच्या बळावर  त्यांनी रेटुन नेले होते. 

तेच हे उपहारगृह. मग कधी नुसताच चहा तर कधी मिसळपाव खाल्यानंतर चहा. यांच्या ह्या स्पेशल काउंटर वरुन घेतलेल्या चहाचे घोट घेतांना मित्रांबरोबर मारलेल्या गहन विषयावरील गप्पा.

चर्चगेट रेल्वेस्थानका समोरचे " कॅफे भारत "





OLD POST



त्यांना वेध लागले होते ते बादशाहाचे . अमेरीकन शेवपुरी आणि फालुदा खाण्याचे

 आज दुपारी लोहारचाळीत खरेदीसाठी फिरफिर फिरतांना या ठिकाणी खाण्याचा झालेला मोह राजाभाऊनी निग्रहाने टाळला. कारण त्यांना वेध लागले होते ते बादशाहाचे . अमेरीकन शेवपुरी आणि फालुदा खाण्याचे.






प्रकाश उपहारगृह

 संध्याकाळी आता खायला कुठे जायचे या गहन प्रश्नाचे उत्तर शोढणे राजाभाऊंना जरा कठीण जात होते. 

मग त्यांनी गाडी दादरच्या प्रकाश उपहारगृहाकडे वळवली.

दहीमिसळ, पियुष, कुर्मापुरी आणि जरासा खोबरा पॅटीस.  

पण या नव्या जागेत त्यांचे मन आणि पोट फारसे रमले नाही. एकतर ही जागा खुप लहान आणि विचित्र आकाराची, त्यात अफाट गर्दी व त्यात परत पदार्थांच्या चवीत त्यांना जाणवलेला फरक. 

पण मात्र पियुष मात्र चांगले दोन ग्लास भरुन ते प्यायले.  यात दोष कोणाचा असेल तर तो वाढत्या उकाड्याचा.

सुखसागरची पावभाजी

 गाईच्या कळपात मोकाट सुटलेल्या वळु सारखेच आज राजाभाऊ सकाळपासुन उधळले आहेत. फरक एवढाच की गाईंच्या ऐवजी उपहारगृहे आणि भोजन गृह.

सकाळपासुन सुरु झालेल्या खाद्यभ्रमंतीची अखेर मध्यरात्री मघईजोडी पानाने झाली.

त्याआधी राजाभाऊंनी सुखसागरची पावभाजी रिचवली होती. 

गिरगाव चौपाटीकडचे सुखसागर. मुंबईमधे आणि एकंदरीत सर्वत्र ज्यांनी पावभाजीसंस्कृती  आणली, रुजवली आणि गेली कित्येक दशके उत्तम चव असलेली पावभाजी खायला घालणाऱ्यांत सुखसागरचा क्रमांक फार फार वरती लागतो.  सरदार, कॅनन , भुलेश्वरची खाऊ गल्ली आणि सुखसागर ही पावभाजीप्रेमींची पंढरी होय.  आता कॅनन आणि खाऊ गल्लीबद्दल सांगता येणे कठीण आहे. पण या इतर दोघांनी मात्र अजुनही परंपरा जपली आहे. 

रात्री दोन वाजेपर्यंत दवाजे उघडे असलेल्या या सुखसागरच्या मुळे निशाचर राजाभाऊ नेहमीच निर्धास्त राहिले आहेत. कितीही उशीर झाला असलातरी या दिशेने गाडी वळवल्यानंतर आपले उदरभरण होणारच यांची त्यांना सदैव खात्री वाटत आली आहे.








Sunday, September 04, 2022

दयाराम दामोदरकडे पोचले. सुतारफेणी आणायला.

 राजाभाऊ सण साजरा करायला आज सकाळी सकाळी दयाराम दामोदरकडे पोचले.

सुतारफेणी आणायला.




उकडीचे मोदक

 काळेकाकांच्या वाट्याला नक्की किती उकडीचे मोदक आहेत हे काळेकाकुंनी जर का आधी स्पष्ट केले असते तर बरं झाले असते.

Saturday, September 03, 2022

कॉपर चिमनी

 राजाभाऊंना वरळीचे कॉपर चिमनी व तेथले जेवण नेहमीच मोहवत आलेले आहे. साद घालत आलेले आहे. 

त्यांच्या आवडीच्या रेस्टॉंरंट मधे याचा क्रमांक फार फार वरती लागतो. या जागी राजाभाऊ नेहमीच येथल्या चविष्ट जेवणाचा मनापासुन आस्वाद घेत आले आहेत.  ही एकमेव जागा अशी असेल जेथे जेवतांना आपण मांसाहार करत असतो तर नक्कीच हे खाल्ले असते, ते खाल्ले असते असे राजाभाऊंना केव्हातरी वाटत रहाते. जेव्हा जेव्हा त्यांच्या घरच्यांना एखादा प्रसंग साजरा करायचा असेल त्या त्या वेळी हे रेस्टॉंरंट हमखास ठरलेले.

राजाभाऊंचे जे जेवण मकाई मलई सीग , त्यासोबत मिळणारी मस्त चटणी, क्रिस्पी रुमाली रोटी ह्यापासुन सुरु झाले ते दम आलु, मलई कोफ्ता आणि ते ही काबुली नान सोबत यांनी संपले. खरं तर बिर्याणी खाण्याचे खुप मनात होते. पण त्यांनी आपला हात जरा आखडता घेतला.

कॉपर चिमनी मधे मांसाहारी लोकांची मोठी चंगळ असते. आणि ते ह्या सामिष पदार्थांची मजा पुरेपुर लुटतात. आणि त्यांच्या बरोबरच्यांनी ती मजा केलीच.










Friday, September 02, 2022

काय तुर्प्ती झाली की नाही

 "काय तुर्प्ती झाली की नाही "

राजाभाऊंनी 

पहिला उकडीचा मोदक घेतला, मधे फोडला, त्यात मस्तपैकी तुप ओतले, स्वाहा.

दुसरा उकडीचा मोदक घेतला, मधे फोडला, त्यात मस्तपैकी तुप ओतले, स्वाहा.

तिसरा उकडीचा मोदक घेतला, मधे फोडला, त्यात मस्तपैकी तुप ओतले, स्वाहा.

.

.

सातवा उकडीचा मोदक घेतला, मधे फोडला, त्यात मस्तपैकी तुप ओतले, स्वाहा.

जेवणात पोळीभाजी, आमटीभात असतो याचा जणु विसरच राजाभाऊंना पडला.

एकविस मोदक खाण्याची इच्छा होती खरी, पण कोणीतरी त्यात खोडा घातला.

Thursday, September 01, 2022

मस्तपैकी भरली वांगी

 आजचा बेत फार फर्मास होता. 

मस्तपैकी भरली वांगी.  या भरल्या वांग्याचा मसाला किती लाजबाब लागतो. त्यात दाण्याचे कुट टाकलेले असले तर वा ! अमॄतानंदच ! 

पण येवढ्याने तिचे समाधान होत नाही. जोडीला पिठले, शेवगाच्या शेंगा टाकुन केलेले, चव आणखी चविष्ट करण्यासाठी माफक प्रमाणात टाकलेली आमसुले. 

नवऱ्याला आणखीन खुळावायचे असल्याने मग यासोबत बाजरीची गरमागरम भाकरी ( तुप आणि, लोण्याचा गोळा सोबत ). लसणाची, शेंगदाण्याची चटण्या. 

आई ग ! तुझ्या हातच्या स्वयपाकाची चव विसरलो ग !

पुर्णिमा रेस्टॉंरट

 श्री. चंद्रमोहन कुलकर्णीसरांचे चित्रप्रदर्शन पाहुन झाल्यावर मग फोर्ट मधल्या एखाद्या उपहारगृहात उदरभरण करावयासी जावे असा जणु अलिखित नियमच आहे की काय असे राजाभाऊंना गेले काही दिवस त्यांच्या दोन स्नेह्यांनी फेसबुकवर लिहिलेल्या उपहारगृह, भोजनगृहावर , जेवणावर लिहिलेल्या पोष्ट वरुन वाटत होतं. 

त्यात परत काल राजाभाऊंना त्यांच्या कार्यालयात दोन सहकाऱ्यांची झालेल्या उपहारगृहासंबंधी झालेल्या चर्चेत आपले ह्या विषयावर किती ज्ञान तोकडे आहे, अजुन कितीतरी ठिकाणी खायला , जेवायला जायचे आहे हे प्रकर्षाने जाणवले होते.  मग त्यांनी मनाशी ठरवलं , आता आपण  ज्या ठिकाणी खाल्ले आहे तेथे मुद्दामुन म्हणुन जायचे नाही, नविन नविन जागा शोधायच्या.

काही उपहारगृह आयुष्यभर आपल्या अगदी डोळ्यासमोर असतात पण का कोण जाणे आत जावुन खाणॆ काही होत नाही.  ह्या भागातली काही ठिकाणं आज हेरुन ठेवली आहेत.

बॉंम्बे हाऊस समोरचे "पुर्णिमा रेस्टॉंरट " हे त्यापैकी एक. त्यात परत दाक्षिणात्य पदार्थ व मिल्स म्हणजे राजाभाऊंचे अतिशय आवडणारे.  पण आज दुपारी येथे हल्लाबोल करायचा त्यांचा विचार जो होता तो कोणीतरी हाणुन काढला.  काळेकाकूंना "याझदानी" मधे बनमस्का-चाय खायला जायचे होते.  मग काय, बनमस्का तर बनमस्का. 

देशविदेशातले खाद्यपदार्थ मिळणाऱ्या रेस्टॉंरंटाची संख्या मुंबईमधे किती झपाट्याने वाढते आहे, आपण ह्या बदलास अजुनपर्यंत आपण तयार झालेलो कसे नाही हे सुद्धा राजाभाऊंना आज अलाना स्ट्रीट वरचे "बर्मा बर्मा " समोरुन जातांना जाणवले. कधीतरी ब्रम्हदेशातले जेवण जेवायला येथे यायला हवे. 

आता "फोर्ट सेंट्र्ल " गायब होवुन त्याची जागा "३८ बॅंकॉक स्ट्र्रीट " नी घेतली आहे.  "फोर्ट सेंट्र्ल " मधे कधीतरी डोसे खायला जाणॆ व्ह्यायचे.  आता बॅंकॉकला पण जायला हवं. 

आता शाकाहारी माणसांना "ग्रब कॉर्नर " मधे काय खायला मिळणार ?  पण येथे जावुन राजाभाऊ तुम्हाला ॲपल पाय, मावा केक वगैरे जावुन खायला हरकत नाही.













नेवेद्य दाखवुन झाला " हे शब्द कानी किती गोड लागतात.

नेवेद्य दाखवुन झाला "

हे शब्द कानी किती गोड लागतात.




उकडीच्या मोदकाच्या प्रतिक्षेत असलेले राजाभाऊ

बाप्पा हे काळेभटजी फार स्लो आहेत. 

अजुन काही पुजा संपत संपत नाही आणि ...... उकडीच्या मोदकाच्या प्रतिक्षेत असलेले राजाभाऊ




चुकला फकीर मशिदीत सापडावा

 मंडपातुन गायब झालेले राजाभाऊ अखेरीस याच्या समोर सापडले . 

चुकला फकीर मशिदीत सापडावा अगदी तसेच





निशाचाऱ्यांसाठी चहा

 तर ही अशी कष्टकरी माणसांची मुंबई.

रात्रीचे जवळजवळ साडेबारा वाजले आहे.

निशाचाऱ्यांसाठी चहा विकण्याची ही नवी पध्दत शोधली गेलेली आहे.




रामा नायक श्री कृष्ण बोर्डींग

 गेले कित्येक दिवस, महिने, वर्षे राजाभाऊंची तडफड होत होती. एक साधी इच्छा आणि ती पण पुरी होवु नये ? 

आज राजाभाऊ घरातुन बऱ्यापैकी लवकर निघाले, होणारी गर्दी टाळायला, नकोसे होणारे ताटकळत बसण्यापासुन दुर रहायला. पण नियतीच्या मनी काही वेगळेच होते. तिला आजच नेमकी राजाभाऊंची परिक्षा बघायची होती. 

राजाभाऊ गाडीत बसले. नवाकोरा टायर भुईसपाट. काय पनवती मागे लागली आहे हे केवळ राधे गुरु मॉं च जाणॆ. टायर बदलणॆ, पेट्रोलपंपावर जावुन पंक्चर काढणे ह्यात तासदिड तास गेला.  वाटेला लागे लागेपर्यंत पोटात भुक चांगलीच धडका मारु लागलेली. सकाळीच ह्या महामुर्ख माणसाच्या डोक्यात घुसायला पाहिजे होते की आज लालबाग, परळ भागात जाण्यात अर्थ नाही. सार्वजनिक गणपती घेवुन जाण्यासाठी मंडळांची आज लगबग चालु असेल. चिंचपोकळी ट्रॅफिक जॅम. गाडी वळवली , ना.म.जोशी मार्गावर. तेथे ही जॅम. गाडी माघारी वळवली , पण निराश होवुन नव्हे तर नवा मोकळा मार्ग शोधायला. तुळशी पाईप रस्ता, तो पण थोडा काळ जॅम. पुढे परळला वळल्यावर परत रस्ता जॅम. परत वळले. मग दुसरा रस्ता घेवुन ते इप्सीत जागी पोचले. गाडी उभी करायला जवळपास कुठेच जागा मिळेना. 

एवढ्या अडचणी आल्या , राजाभाऊंचा धीर तसा  खचत चालला होता पण काळेकाकु त्यांचे मनोधैर्य मधुन मधुन वाढवत राहिल्या आणि त्यामुळेच मग राजाभाऊं देखील "दुनिया की कोई ताकद आज   मुझे रोक नही सकती " हे आपल्या मनाला संपुर्ण प्रवासात बजावत राहिले. 

घरातुन निघाल्यापासुन जवळजवळ तीन तासाने शेवटी ते कसेबसे पोचले "रामा नायक श्री कृष्ण बोर्डींग " मधे  जेवायला. पण तेथे गेल्यावर मात्र त्यांचे हातपाय गळले तेथली गर्दी पाहुन.  धडपड केल्यावर कधीतरी असा एखादा क्षण येतो की तेव्हा वाटते " लेट इट गो ".  पण काळेकाकु परत एकदा ठामपणे मागे उभा राहिल्या. वीसपंचवीच मिनिटाने का होईना त्यांचा नंबर लागला.

जेवतांना राजाभाऊंना आपली ही एवढी धडपड, पोचण्यासाठी जीवाचा केलेला आटापीटा सार्थकी लागल्याचे समाधान मिळाले. 

आज पाल पायसमचा बेत. त्यात परत अवीयल, कच्च्या केळ्याची भाजी, बटाटाची रस्सेदार भाजी, ताजेताजे लोणचे, श्रीखंड, घट्ट दही, रसम, सांबार, भाताच्या मुदी, आणि पापडम.

मग काय. यज्ञकुंडात पेटलेला अग्नी चेतवण्यासाठी जसे तुप ओतत रहातात अगदी तसंच राजाभाऊ गरमागरम तिखट तिखट रसम पोटात ओतत राहिले आणि हाणत राहिले. 

मग शेवटी शेवटी आडवा हात मारत राहिले,  भातावर ओतलेले चहुबाजुने धावणारे सांबार आवरण्यासाठी.  

खरं तर आज जेवायचे होते केळीच्या पानात. अमर्यादीत. पण ते जेवायचे खुप गर्दी होती म्हणुन नाईलाजस्तव ताटात जेवायला लागले.

आता पुन्हा केव्हातरी केळीच्या पानात भोजन.












"नही भाई, अभी नही, डायबेटीस है

 ह्या गुलाबजामुन सारखचं गोड स्मित करत या गृहस्थानी राजाभाऊंना आमंत्रण दिले.

तेवढ्याच कडवटपणे राजाभाऊंनी ते नाकारले.

"नही भाई, अभी नही, डायबेटीस है "





रॉकी आणि मयुर

मयुर आणि रॉकी, हायवे ऑन प्लेटवाले.

दोघांनीही एकदम राजाभाऊंच्या भरगच्च पोटावरुन हात फिरवला आणि म्हणाले 

"आपका पेट देखकेही पता चलता है की आप फूडी हो "




द बे लिफ

 काल रात्री घरी जातांना शास्त्री रोडवर असलेल्या काका हलवाईच्या समोर हल्लीच सुरु झालेल्या "सॅफ्रन " नामक रेस्टॉंरंटनी राजाभाऊंचे लक्ष वेधुन घेतले होते. लगेचच आजच्या सकाळी सपत्नीक ते तेथे पोचले. 

पण एकतर तेथे खुप गर्दी होती आणि अशी ठिकाणे त्यांना फारशी भावत नाहीत म्हणुन मग ते तेथुन निघाले. आज निवांतपणे, चवीचवीने , शांतपणे , तिच्या सोबत जेवावसे त्यांना फार वाटत होते. 

आणि परत त्यात श्रावण,  त्यांच्या आवडीच्या ठिकाणी खास श्रावणासाठी म्हणुन कमी दरात ठेवलेले शाकाहारी जेवण. 

मग राजाभाऊ " द बे लिफ " मधे जेवायला गेले.  आज संडे ब्रंच असल्यामुळे बुफेचे दर नेहमी प्रमाणे होते. ही बाब आधी एकतर त्यांच्या लक्षात आली नाही किंवा आली असुन त्यांनी त्याच्याकडे कानाडोळा केला.



Old post 



राजाभाऊ आणि चितळे.

 मागणाऱ्याने मागितले. दिणाऱ्याने दिले, खाणाऱ्याने खाल्ले.

राजाभाऊ आणि चितळे.

पन्नास ग्रॅम जिलेबी.

एक जिलेबी आणि वरती एक लहानुसाच तुकडा. पन्नास ग्रॅमला दोनचार ग्रॅम वजन कमी पडले म्हणुन.

खाणाऱ्यानी खाल्ली पण त्याचे समाधान काही झाले नाही.

मग परत एकदा पन्नास दुणे शंभर.

आणि गोड खाल्ले म्हणुन दोनशे आलेपाक.

बायकोचा सर्वात जास्त राग केव्हा येत असेल ?

 असेच केव्हातरी.

"बायकोचा सर्वात जास्त राग केव्हा येत असेल ?

आज सुट्टीच्या दिवशी राजाभाऊ कधी नाहे ते सकाळी सहा वाजता उठुन बसलेले.

आत्ता घड्याळाचा काटा नवाला स्पर्श करु लागलायं, भुकेनी कळवळलेल्या जीवास कसेबसे धरुन ठेवलेले.

अजुन पर्यंत काही भांड्यांचा आवाज कानी पडत नाही. आज सारा काही थंड थंड कारभार. जीव आळसावलेला.

होतोय. होतोय. जरा  धीर धर, नाही , नाहीत, घरात बिस्कीट नाहीत, उगाच काहीतरी खात बसु नकोस, रवा डोसा होतोय.

होतोय, होत आहे, आत्ता तयार होईल, धीरसबुरी काही आहे की नाही, हा पाढा जेव्हा आतुन सुरु होतो ना तेव्हा मात्र फार राग येतो. बायकोचा.

आणि त्यात ती जेव्हा जा आंघोळ करुन घे हे फर्मान सोडते तेव्हा तर.

पण पारा काही अजुन पर्यंत बॉयलींग पॉईंट पर्यंत पोचलेला नसतो.

बिघडला वाटतं.

आणि मग संतापाचा भडका उडतो.

"हा बघ, काय मस्त कुरकुरीत झाला आहे "

आणि जसा जसा एकएक दोसा आत पोटात जावु लागतो ना तेव्हा पुन्हा एकदा बायकोवरील प्रेम हळु हळु उतु जावु लागते."

ग्राहकमेळा व खाद्‍यजत्रा.

 चित्तपावन ब्राम्हण संघ. मुंबई.

ग्राहकमेळा व खाद्‍यजत्रा.

मुरटकाळे.

गाईंच्या कळपात बिथरलेला सांड.

आणि अश्या खाद्‍यजत्रेत मोकाट सुटलेले काळेकाका.

वरणफळ.

खान्देशी शेवेची भाजी.

रगडा पॅटीस

खरवस

पियुष

आणि 

भाजणीचे वडे , चटणी सोबत.

"आज रात्री घरी जेवायला काय करणार आहेस ?"

जळजळीत नजर.

हे खाऊ का ते खाऊ?

 हे खाऊ का ते खाऊ?





राजाभाऊ.
शेवटी हीच वेळ तुमच्यावर येणार आहे हो.



रामा नायक कडचं जेवण

 


लंबोदर आणि राजाभाऊ, दोघांनाही परमप्रिय.

 लंबोदर आणि राजाभाऊ, दोघांनाही परमप्रिय.