Saturday, January 21, 2023

फिस्ट इंडीया कंपनी

 डेलीकसी आणि डेलीकेट हे दोन शब्द मनात उमटले जेव्हा माखनी पनीरचा पहिला घास  घेतला आणि अगदीच तशीच प्रतिक्रिया उमटली जेव्हा केशरयुक्त बदाम शोरबा या सुपचा पहिला चमचा काय ओठाला लावला तेव्हा. आणि त्या सोबतचा वारकी पराठा म्हणजे क्या कहना. भाजीला एकदम पर्फेक्ट मॅच.

लाजबाब. प्रशंशा, तारीफ करावी तेवढी थोडीच. बढीया. फेसबुकवर या रेस्टॉरंट्बद्दलच्या चांगले रिव्ह्यु वाचले होते तेव्हापासुन केव्हा एकदा पुण्याला जातो व येथे जेवायला जातो असे राजाभाऊंना झाले होते. पुण्याला पोचल्यापोचल्या लागलीच मग राजाभाऊ "फिस्ट इंडीया कंपनी" मधे पोचले.

राजाभाऊंनी अवधी फुड आयुष्यात पहिल्यांदाच खाल्ले आणि ते अवधी जेवणाच्या व ते खावु घालणाऱ्या "फिस्ट इंडींया कंपनी"च्या प्रेमात पडले नसतील तर नवलच.

अवधी जेवण. घास घेतल्या बरोबर तोंडात विरघळणारे जेवण 

मऊ मुलायम असे ते पनीर व केशर युक्त ती लाजबाब ग्रेव्ही. सोबत वारकी पराठा. बहार आली.

बिलकुल तेल नसलेले, अजीबात मसालेदार, चमचमीत नसलेले, अगदी राजाभाऊंना हवे असते तसे हे जेवण होते.

राजाभाऊ "फिस्ट इंडीया कंपनी " वर फिदा झाले आहेत

https://www.zomato.com/pune/feast-india-company-erandwane








No comments: