Saturday, January 21, 2023

आधीच महिला बचत गटांचे प्रदर्शन म्हणजे राजेशभाईंचा विक पॉईंट

 आज काळेभाऊंचा खिसा खाली झाला आणि तुंदीलतनु पोट अंमळ जरा जास्तच वर आले.

आधीच महिला बचत गटांचे प्रदर्शन म्हणजे राजेशभाईंचा विक पॉईंट. त्यात बचत गट यांची उत्पादनं व त्यांचे खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, जणु गरमागरम पुरणपोळी आणि त्यावर धरलेली साजुक तुपाची धार.

काय खरेदी करु आणि काय खाऊ, किती खाऊ ,कसे खाऊ . जणु मोकाट सुटलेला वळु. या वळुला वेसण कशी घालायची ते त्यांना बरोबर ठावुक.

तरी बरं त्यांची आपली छोटी छोटी , लहानसहान वस्तुंची खरेदी असते. आणि तसं बघायला गेलं तर खाणे पण फारसं काही जास्त नसतं.

खानदेशी मांडे , वांग्याचे भरीत आणि ज्वारीची भाकरी. बारामतीकरांकडुन गरमागरम बाजरीची भाकरी, मिरचीचा ठेसा आणि पिठलं, तोंडी लावायला बिनपाण्याची कांद्याची भजी व आपलं उगीचच नावाला थालीपिठ.

उकडीचे मोदक (नव्हता चांगला ) आणि घावनं तव्यावरुन ताटामधे चटणी सोबत.

पण मी काय म्हणतो माणसांने वटारलेल्या या डोळ्यांना येवढे कशासाठी घाबरुन रहायला हवं ? 

हुरड्‍याचे थालीपीठ खाण्याचे राहुन गेलं ना.


Re-post

No comments: