Saturday, January 28, 2023

आता पुढच्या वेळी सकाळी या, मासवड्या, पुरणपोळ्या करते

 कोणाच्या नशीबी कधी, कोठे, कुठले, आणि काय अन्न असेल ते सांगता येणे कठीण आहे, किंबहुना ते अन्न तेथे राजाभाऊंना ओढुन घेवुन जाते अशी त्यांना दाट शंका आहे. 

नगरला हुरडा खाण्याचा बेत करता करता राजाभाऊ पोचले मोराच्या चिंचोलीला. 

मोर बघुन झाले, राजाभाऊ परतीच्या प्रवासाला लागले. पोटात नेहमीप्रमाणे वडवानल पेटलाच होता, आता कधी पुण्यात पोचणार व आपल्याला जेवायला किती वाजणार, उपाशी पोटी गाडी कशी चालवायची ह्या विचारांनी बेजार झाले असतांना त्यांची नजर एका घराकडे वळली.  छोटेसे घर , मस्त मोठे आंगण. 

नवीनच सुरु झालेले दिसतेय , बघुया काय खायला मिळते का करत राजाभाऊ आत शिरले. वेळ संध्याकाळी सहा.

"कांदा भजी आणि चहा मिळेल "

बेसन खायचे नाही. आता नुसता चहा पिवुन उपाशी पोटी जायचे, सॉलीड टेंशन. 

कांदा भाजी होवेस्तो जरा आजुबाजुला भटकुन झाले, एक माजी सैनिक, जे येथे पर्यटकांना रहाण्यासाठी खोल्या बांधताहेत , जेवणाची सोय करताहेत त्यांच्याशी मनोसोक्त गप्पा झाल्या. बोराच्या झाडाखाली पडलेली बोरे आणि चिंचेनी लगडलेल्या झाडावरची चिंच खावुन झाल्या.  

निरोप घेवुन परतीच्या वाटेला लागायच्या वेळी आजीबाईं म्हणाल्या "आज सकाळी आला असतात तर बरं झाले असते, मासवडीचा बेत होता, आता पुढच्या वेळी सकाळी या, मासवड्या, पुरणपोळ्या करते."




राजाभाऊंनी संधी हेरली. "पुढच्या वेळी कशाला, आजच द्‍या की " 

आजीआजोबा खुष झाले.

मग काय , मस्तपैकी बेत ठरला. छानश्या अंगणात गप्पांची बैठक आणि भोजन.

एक अपवाद वगळता सर्व पदार्थ उत्तम होते. 

शेवटी तुम्ही काय खाता हे महत्वाचे नसते. महत्वाचे असते ती आपुलकी, प्रेम, आपलेपण ,हौस, उत्साह, आग्रह, 

श्री, संतोष नाणेकर

श्री म्हाळासाकांत कृषी पर्यटन केंद्र.

भ्रमणध्वनी- ८३०८८९२८४५, ७७४४९०१५५०.

No comments: