Friday, September 30, 2022

सुजाता

 सुजाता . 

बायका आपल्या नवऱ्यावर बारीक लक्ष ठेवायला आजकल फेसबुकवर आपलं खातं खोलतात असा राजाभाऊंना दाट संशय आहे.  हेरगिरी निव्वळ हेरगिरी.

आपला नवरा आज कुठे  हादाडायला गेला होता हेच , केवळ हेच जाणुन घेण्यासाठी तर काळेकाकूंनी हा सारा खटाटोप तर मांडला नसावा ? 

आज येथे जेवतांना राजाभाऊंना नक्की खात्री होती , आपली बायको आपल्यावर नक्कीच ओरडणार. पण त्यांना खात्री होती की हे ओरडणे काहीसे वेगळे असेल. 

का जेवायला बाहेर गेला च्या ऐवजी एकटा का येथे जेवायला गेलास   ?

आजकालच्या जमान्यात मुंबईमधे मराठमोळं भोजन मिळेल अशी उपहारगृह राहिली आहेत तरी कुठे ? हातांच्या की हाताच्या बोटावर मोजता येतील एवढी. ठाकुरद्वारचे "सुजाता उपहार गृह " (पुर्वश्रमीचे बी. तांबे ) मात्र आपला चेहरामोहरा अजुनही शाबुत ठेवुन आहे.

"आलोच " म्हणुन राजाभाऊ जे गायब झाले ते पोचले थेट "सुजाता" मधे. दोन वाट्या घट्ट गोड दही, दोन वाट्या चवदार , रुचकर आमटी आणि बटाटा सुकी भाजी खायला.  हा सारा पसारा मांडला गेला होता ते केवळ "डाळींबी" साठी.

ताट.  

ताटात दोन भाज्या आपल्या आवडीप्रमाणे. जवळजवळ ७-८ भाज्यांमधुन निवडायच्या.  मग त्यासोबत आमटीभात,  दही आणि समाधान.

हे समाधान शेवटी सत्य.





No comments: