Saturday, April 23, 2022

तुमच्या कडे तांदळ्याच्या भाकऱ्या मिळतात काय

 ज्याच्या नशीबी जेथे खाणे लिहिले असते तेथे ते त्याला ओढुन घेवुन जाते ही बाकी खरे.

आज राजाभाऊंच्या मनात तांदळ्याच्या भाकऱ्या खाण्याची इच्छा खुप प्रबळ होती. पंचवीस एक वर्षापुर्वी अर्नाळाल्या त्या खाल्लेल्या स्मरणात होत्या. त्या तांदळ्याच्या भाकऱ्यांच्या ओढीने राजाभाऊ अर्नाळ्याला पोचले खरे पण तेथे काय त्यांचे मन रमले नाही. मग तशेच उपाशी पोटी ते तेथुन परतीच्या मार्गाला लागले, दुपारचे दोन वाजलेले. जीव भुकेने नुसता कासावीस झालेला, प्राण कसेबसे धरुन ठेवलेले.  आता येथे काय कुठे घरगुती जेवण मिळायचे ? 

अचानक त्यांची नजर आगाशी मधे एका फलकावर गेली. चमचमीत मराठी भोजन. "अन्नपुर्णा " घरगुती. मग काय, गाडीला करकच्चुन ब्रेक. 

विचारायला काय जाते म्हणुन सहजच त्यांनी विचारले "तुमच्या कडे तांदळ्याच्या भाकऱ्या मिळतात काय ?  " , ज्याचे उत्तर होकारार्थी मिळाले. मग काय. गरमागरम , अप्रतिम चवीच्या दोन भाकऱ्या, कोबेची भाजी आणि मसुऱ्याची रस्सेदार भाजी.

जेथे उपाशी पोटी परतण्याची वेळ आली होती तेथे अचानक मेजवानी मिळली.

अन्नदाता सुखी भवः  

No comments: