Tuesday, November 05, 2013

सोपा उपाय

एका कथेतला प्रसंग राहुन राहुन आठवतो. खास करुन त्या वेळी.

शेतामधले शेतकऱ्याचे घर. घराबाहेरची उंच पायरी. खाली उतरायला सोईस्कर पडावे म्हणुन ठेवलेला एक मोठा चपटा दगड. 

सततच्या वापराने तो जेथे नेहमी पाय ठेवले जातात त्या भागात घासुन घासुन खुप झिजतो. चांगले भोक पडायला लागते. मग तो शेतकरी एक सोपा मार्ग शोधतो. तो उचलुन उलटा करतो.

मग त्याच्या लक्षात येते हा सोपा उपाय त्याच्या आजोबांनाही सुचला होता.

बाटलीतला शांपु संपलेला असतो. सोपा उपाय म्हणजे त्यात पाणी टाकुन बाटली चांगली उलटीसुलटी करायची, दोनपाच स्नानं त्यात निघुन जातात.

राजाभाऊंनी पण आज तसेच केले.

मग त्यांच्या लक्षात आले, हा सोपा उपाय त्यांच्या आधी बायकोला पण सुचला होता.

No comments: