Saturday, October 04, 2008

काय उपयोगाचे ?




ज्या संकुलात नामवंत कलावंत, कलाकार, साहीत्यक, समीक्षक, रसीक मंडळी  रहातात तेथेले हे सुरेख Ampi Theater वास्तवीक पहाता नेहमीच वापरले जायला हवे होते. 

पण ? 

ललिता पंचमी


आज ललिता पंचमी. राजाभाऊंचा जन्म दिवस. योगायोगाने यंदाला ४ ऑटोबर व ललिता पंचमी एकाच दिवशी आले आहेत.
 
वाडदिवसाचे सेलेब्रेशन काल रात्री पासुनच सुरु झाले. डिनर ला त्याचा साठी खास सिझलर्स बनवले गेले , सकाळी न्याहारी साठी डाळ ढोकली.
 
जेवणाचा बेत ही खासा. चक्क उकडीचे मोदक , ओल्या नारळाच्या करंज्या,  छोले भतुरे. 
 
आता सायंकाळी कोठे बरे जायचे जेवायला ? 

शिवछत्रपती क्रिडा संकुल, बालेवाडी

 
कोट्यावधी रुपये खर्चुन बांधलेल्या शिवछत्रपती क्रिडा संकुल, बालेवाडी, पुणॆ याचा वापर केवळ राष्ट्रकुल युवा स्पर्धे पुरताच सीमीत न रहाता त्याचा वापर या पुढे ही सर्व खेळाडू, क्रिडारसीक यांच्यासाठी सदैव होत रहावा.

नाही तर गेल्या स्पर्धे नंतर जसे संकुल धुळ खात पडले होते त्या प्रमाणॆ परत त्याची गत व्हावी.

Thursday, October 02, 2008

खादी परिधान करण्यासारखे सुख नाही



उन्हाळ्यात शीतल , हेमंत ॠतुत उबदार असलेल्या खादीचे कपडे मला परमप्रिय ।

महात्मा गांधी जयंतीच्या दिवसापासुन पुढील एक महीना २० % सुट खादीवर मिळते।

(पुर्वी 35 % मिळत असे।)


चला या निम्मित्ते का होईना लोकांना महात्मा गांधीजींची व खादीची आठवण तरी येते

आयुष्यभर मी या दिवशी खादीचे सदरे , लेंगे, शर्ट खरेदी करतोच करतो।


मुंबई खादी ग्रामोद्योग भवन मधे आज तोबा गर्दी उसळलीय , सवलतीचा लाभ घ्यायला

पण का हो राजाभाऊ

काय हो राजाभाऊ , काही नेत्यांना सतत भाषणे ठोकतांना सदैवी जहाल भाषेचाच आश्रय का बरे घ्यायला लागतो ?

घटस्थापना



शितला देवी - माहिम


काली माता - बंगाल क्लब शिवाजी पार्क


हे असे का ?

महालक्ष्मी मंदिर मुंबई , पहाटे सहा वाजताच रांगा वरळी पर्यंत पोचु लागल्या




आणि , शितला देवी येथे
व प्रभादेवी च्या देवळात



व्यवसायासाठी सर्व काही करावे लागते रे तात्या !


असा हा मी Emotioanal Trap मधे का बरे सापडतो आहे ?

Wednesday, October 01, 2008

रामलीला

प्रभुरामचंद्र यज्ञात विघ्न आणणारया असुरांचा वध करताना ।

उडीपी बोर्डिग - फोर्ट मार्केट जवळ





रविवारी साऊथ इंडियन मिल्स खाण्याची इच्छा जी काही प्रबल झाली होती , ती अखेर उडीपी बोर्डिग मधे सोमवारी जेवायला जावुन शमावावी लागली ।


केवल फक्त तीस रुपयात , दोन भाज्या, एक गाजराची ,दुसरी सफेद हे हे सांबार, रसम, वरण, दोन मुद भात, (काकडीची पचडी, दही, ताक़, (मला वर्जित )) लोणचे , पापड।


भर दुपारी येथे गेलो तेव्हा हे अगदी खचाखचा भरले होते, जवळ पासच्या कार्यालयातीकर्मचारी वर्गात हे खुपच प्रसिद्ध दिसते।


जेवण साधे सोपे , रुचकर, मला जसे लागते तसेच होते ।

बोलो सियावर रामचंद्र की जय





गिरगाव चौपाटीवर सालाबाद प्रमाणे यंदाही रामलीला सुरु झाली आहे , प्रभु रामचंद्र चे दर्शन घेण्याचा आज योग जुळुन आला, आयुष्यात पहिल्यांदाच।

सोल करी - पुणे व पार्क विहार - वाशी



पोटाला जोरात चिमटा काढुन पाहिला मी पुण्यातल्या उपहारगृहात आहे का मद्रास मधल्या ?

Kongnadu Cuisine, Chettinand Cuisine, Nanjilnadu Cuisine.

Vazhapioo adai, PallipalayamPaneer Varural, Kongu Mushroom Fry, Raja Bhojana Kuzhambu,Mani Kaara Kuzhuabu,Marungi Vazhaipoo , Kuzhuabu, Kondaikadalai Thirattah, Kaaia Viyal, Urulaithokku, Vendaikkai Milagu, Kaaikati Perattal, Vemlakka Kaai Saalna.

पुणे मुंबई प्रवासात विठ्ठल कामत यांचे "सोल करी " सदैव साद घालत असे , गेल्या रविवारी ठरवलच आता येथे थांबायचेच । अमळ लवकर गेल्या मुळे त्या वेळी फक्त नाना प्रकारचे इडली , डोसे, उत्तप्पे आदी उपलब्ध होते। मग मी पोडी दोसा मागवला , हा प्रकार मी पहिल्यांदाच चाखला , डोश्याचा आत चटणी लावली होती , मस्त लागला । हे उपहारगृह फार चांगले आहे , आता प्रवासात थांबायचे कोठे हा प्रश्न मिटला ।




वाशीला टुंगा रेसिडन्सी मधले विहार हे (सेंटर वन माँलच्या बाजुचे ) उपहारग्रुह देखील मनात भरले होते , पुण्याला जाताना याही ठिकाणी भेट दिली।




रवा डोसा जो मला का कोण जाणे फार आवडतो , ( खरच आवडतो का माहीत नाही ) मागवला , आणि अवचित आवडुन गेला, मस्तपैकी अगदी नाजुकसा होता , चव तर ख़ास होती ,


हे ही उपहरग्रुह आता मनात भरले आहे ।

Tuesday, September 30, 2008

उदे गं अंबे उदे! गावदेवी व काळबादेवी

काळबादेवी

गावदेवी



केव्हा केव्हा वाटते देवांचे व देवळाचे पण माणसा सारखे नशीब असते काय ? काही देवळात भाविकांची अलोट गर्दी असते तर काही मधे फारच कमी । मुंबादेवीला तर आज पहिल्या दिवशी अफाट गर्दी होती।

Sunday, September 28, 2008

सुरेख रानफुले फुलली आहेत अगदी परसदारात



सौ.प्रियदर्शनी कुलकर्णी

तीरु लिल्ला तीरु लिल्ला, गाये लता गाये लता, जलेम्बु जलेम्बु.


स्वर्गीय आवाज आज ऐंशी वर्षाचा झाला. 

साऱ्या दुनीयेतील गाणी एक तरफ और दुसरी तरफ "सी. रामचंद्र यांचे झांझर मधे लता नी रुलवलेले 
 
"जी चाहता है दुनीया अब तो से रुठ जाये ओठो पे आ रही है अब मौत की दुवाये
ओ बेवफा जमाने दिल तो लगाके देखा सब कुछ लुटाके देखा 
 
अपना समज के उनको अपना बनाके देखा दिल मे बसा के देखा 
लेकीन मिली वफा के बदले जफाये ओठो पे आ रही है अब मौत की दुवाये 
 
चलते ना तीर बनके दिल ना अगर लगाते धोके मे आ न जाते 
ये दिन न देखते हम आसु नही बहाते दो दिन तो मुस्कुराते
 
घिर घिर के युं ना आती अश्कोभरी जफाये !
 
मग ऐकु लागलो  
 
दिल मेरा तोडा- मजबुर 
सावरी सुरत मन भाई रे पीया तोरी 
बांधी प्रित फुलवर मन लेके चीत चोर दुर जाना ना
हमारे बाद अब - बागी
हाय दिल तोड दिया - मीना बाजार
आंसू अब तु न बहाना- काबीला
न जा न जा बलम- परदेशी
बाजुबंद खुल खुल जाये
मांगने से जो मौत मिलती 
सुबह काइंतजार कौन करे 
मै तुम्हीसे ये पुछती हुं  - बॅक कॅट  
सो गयी चंदनी - आकाश 
भुल सके ना हम और तुम तो जाके भुल गये-  तमाशा 
हाय चंदा गये परदेश - चकोरी 
किसी नजर का मस्त ईशा रा है जींदगी -रागरंग
बेदर्द जमाने से- रिस्ता
दुखियारे नैना - निर्मोही
दिले नाशाद को जीने की - नादान 
मेरे द्वार खुले है - अनमोल रतन 
सपना बन साजन आये - शोखीयां
आंखो मे चीतचोर- मेहमान 
तुझे ओ बेवफा - जिद्दी
खुशी दिलसे गयी - शीशा
तुझे आवाज देती है - हार जीत +
एक ठेस लगी 
अब कौन सहार है 
सून तो लो मेर अफसाना
दिले करार सो जा
उजडी रे मेरे प्यार की दुनीया
घडीया गिनी है मैने
अब कौन सहारा है जब तेरा सहारा छुट गया
प्यार की ये तल्खीया
दिल ही तो है तडप गया
अपना पता बाता दो
कहा तक हम उत्ठाये ये गम
कटती है अब तो जींदगी
आज मेरे नसीब ने मुजको रुला रुला दिया
मेरे लिये वो गमे इंतजार छोड गये
अब गम को बना लेंगे जीने का सहारा  
 
हा असा सिलसीला सारा दिवस सुरु रहाणार आहे
 
आज मी लतामय झालेलो आहे
 
 
लता गाती है बाकी रोते है !!
 
 

सौ.प्रियदर्शनी कुलकर्णी



आज चा दिवस सुरमयी आहे सुरवातच कशी सुरेल झाली,  सौ.प्रियदर्शनी कुलकर्णी यांनी गायलेल्या तोडी, शुक्ल बिलाबल आणि सुकराही या रागांनी.
 
गानतपस्वी मलिक्कार्जुन मन्सूर  यांच्या स्म्रुत्यर्थ आयोजीत "अर्पण" महोत्सवाच्या पहिल्या सत्रात त्यांचे गाणे झाले. 
 
मजा आली.  

Saturday, September 27, 2008

Traveller's Tales: Chennai Snapshots

सर्वोत्तम खाणॆ आणि रहाणे कसे असते हे जर जाणुन घ्यायचे असेल तर या ब्लॉग ला भेट देण्यावाचुन पर्याय नाही. 

Traveller's Tales: Chennai Snapshots: "Saravana Bhavan"

मै सागर की मस्त लहर तु आसमान का चांद

मै सागर की मस्त लहर तु आसमान का चांद
मिलन हो कैसे मिलन हो कैसे मिलन हो कैसे !
 
प्रवासात हे गाणे आठवावे, घरी आल्या वर ते ऐकण्यासाठी सर्व कॅसेंट्स पालथ्या घालाव्यात पण ते सापडु नये. 
 
हाय यह कैसी अवस्था है !
 
वसंत देसाईंनी संगीत बद्ध केलेले व लता नी अजरामर केलेले हे गाणॆ ऐकायला मिळत नाही तो पर्यंत ही बैचैनी अशीच सतावत रहाणार. 

दुसरे आवडते गाणॆ म्हणजे रोशन नी संगीतबद्ध केलेले रागरंग चित्रपटातील

यही बहार है दुनीया को भुल जाने की खुशी मनानेकी यही घडी है जवानीकी गुनगुनानेकी मुस्कुरानेकी ! ये प्यारे प्यारे नजारे ये ठंडी ठंडी हवा ये हल्का हल्का नशा ये काली काली घटांयोंकी मस्त मस्त अदा ये कोयलोंकी सदा! निकल के आ गई रुत मस्तीया लुटानेकी झुम जाने की

गायीका अर्थात लता.

खैरलांजी हत्याकांड

खैरलांजी हत्याकांडातील निरपराध बळी पावलेल्यांना न्यायालयाच्या निर्णयामुळे काही प्रमाणात का होईना न्याय मिळाला.

गुजरात मधे दंगलीत बळी पावलेले, होरपळलेले निष्पाप जीव अजुनही न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत.

Friday, September 26, 2008

युवा राष्ट्रकुल स्पर्धा - पुणे

होतील हो , सर्व काम वेळे आधी पुर्ण होतील , काय घाई आहे। स्पर्धेला अजुन तसा अवकाश आहे ना । उगीचच आधी पुरी करुन करायचे काय ? स्पर्धेच्या वेळी सगळे कसे नवे कोरे चकचकीत दिसायला नको का ? नाहीतर सर्व कसे जुनाट वाटेल , जग मग कसे भारावुन जायेल ?
लोकांना समजत नाहीय की अडथळ्याची शर्यत महामार्गावर ठेवली आहे । स्पर्धकांना लांब उडी मारण्यासाठीच मुद्दामुन खड्डे रस्तात ठेवले आहेत ।
आता काही जण म्हणतात सर्विस रोड चे काम पुरे व्हायचे आहे, बाणेर ला जाणारा रस्ता दुरुस्त व्हायचा आहे , बाले वाडी जवळील उड्डान पुलाचे काम फार रेंगाळय, बाजुलाच ऑर्चिड चे इमारतीचे काम चालले आहे, पण या साऱ्या उगीचच्च्या काळज्या आहेत। दोष दाखवण्याची सवयच काही जणांना असते त्यातला हा प्रकार ।

Wednesday, September 24, 2008

लग्नाचे जेवण श्रुती मंगल कार्यालयात जेवण्यासारखे सुख नाही

आयुष्यात अनेक मंगल कार्यालयात विवाह आदी निमित्ते जाण्याचा योग येतो, जेवण जेवले जाते, पण घरी आलो की आपण काय जेवले होतो ते विसरले जाते, त्यात लक्षात ठेवण्यासारखे काहीच नसते.
 
याला अपवाद फक्त दोन मंगल कार्यालयाचा. एक पुण्यामधील श्रुती मंगल कार्यालयातील व दुसरा सांगलीतील खरे मंगल कार्यलयातील जेवणाचा. 
 
लग्नाचे जेवावे तर येथेच. 
 
श्रुती मंगल कार्यालयात लग्नाचा दिवशी जे जेवण मिळते त्या पेक्षा आदल्या रात्री जे काही जेवण मिळते ते जास्त स्वादिष्ट असते असे माझे प्रामाणीक मत आहे. बेस्ट  इन द होल वर्ल्ड.  प्रत्येक वेळी ते मी खुप एन्जॉय केलय.  त्यात अळू चे फदफदे असेल तर मग काय. राजाभाऊ खुश.      

Monday, September 22, 2008

सनी दा ढाबा - फाय स्टार रेट थर्ड रेट शाकाहारी जेवण

काल मुंबई पुणे हमरस्तावरील कामशेत जवळ असलेल्या सनी दा धाब्या मधे जेवणाचा योग आला । पस्त्तवलो। मांसाहारी , सामिष जेवण करणारी माणसे येथे अगदी आनंदाने जेवत असतील पण माझ्या साठी मात्र ही शिक्षाच होती। खर म्हणजे जेथे मांसाहारी , सामिष जेवण मिळते तेथे जाण्यास मी स्पष्ट नकार देयाला हवा , माझा मुळे इतरांचा नाहक विरस होतो।
मसालेदार, तेलकट महागडे जेवण । आज मुलगा आजारी पडलाय । रेट तर काय विचारु नकात। ढाबा म्हणजे हमरस्तावरील स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याची जागा ही कल्पना आता कालबाह्य झाली आहे।