खुप रुलावलय या लतानी, सी. रामचंद्र आणि
जी चाहता है अब दुनियसे रुठ जाये
ओठोपे आ रही है अब मौत की दुवायें
ओ बेवफा जमाने दिल तो लगा के देखा,
सबकुछ लुटाके देखा
अपना समझ के उनको अपना बनाके देखा
दिल मे बसा के देखा
लेकीन मिली वफा के बदले हमे जफाये
ओठोपे आ रही है अब मौत की दुवायें
चलते ना तीर बनके दिल ना अगर लगाते धोके मे आ न जाते
ये दिन ना देखते हम आसु यु ना बहाते दो दिन तो मुस्कुराते
घिरघिरके यु ना आती अश्कोभरी घटायें
ओठोपे आ रही है अब मौत की दुवायें
http://www.youtube.com/watch?v=BubFwAoRoeg
अब भी एक उम्र पे जीने का न अंदाज आया । ज़िंदगी छोड दे पीछा मेरा, मै बाज़ आया ।।
Thursday, April 08, 2010
.। निसर्गसूक्त । . - ज्ञानदा नाईक
आधीच वैशाख त्यात ज्ञानदा नाईक लिखीत "निसर्गसूक्त " नी वणवा पेटवलायं. या बाई निसर्गात फिरतात तर खऱ्या आणि वरती त्यावर लिहुनही ठेवतात. हा पक्षी, ती पक्षीण, हे झाड तो वृक्ष, ती जांभळे, हे अभयारण्य, तो जलाशय, ते सरोवर ,ही फुले नी ती हरणे.
त्रास होतोय जीवाला नुसता त्रास होतोय.
Wednesday, April 07, 2010
अश्या ह्या बायका
"बहारे फिर भी आयेगी , मगर हम तुम जुदा होंगे , घटांये फिर भी छायेगी .. हे गाणॆ फार छळुन राहिलयं, येवढेच आठवतयं, आगापिछा काहीच सापडत नाहीयं , नुसत डोक्यात गरागरा फिरत राहिलयं "
बसप्रवासात राजाभाऊंनी आपल्या बायकोला सांगितले.
पुढच्या बाकावर बसलेल्या एक बाई मागे वळल्या, व काहीसे पुटपुटल्या. राजाभाऊंच्या काही लक्षात येइना. त्यांनी त्या गाण्याच्या ओळी राजाभाऊंना तीन-चार वेळा सांगितल्या, पण टाळक्यात काही शिरेना, यांना आपल्याला काय सांगायचे आहे.
शेवटी त्या बाईंनी गाणे भर बसमधे त्यांना गाऊन दाखवलं.
दुर्दैवांने ते दुसरेच गाणे होते.
थोडक्यात काय तर आपल्या आवडीच्या गोष्टी माणसाला करायला मिळाल्यातर मग त्याला बाह्यवातावरणाची फिकीर करायचे कारण रहात नाही.
ता.क. आज भल्या सकाळी हे गाणे youtube वर मिळाले. जेव्हा काळजावर लता नामक दुधारी सुरी
अलगद चालत रहाते
Suhanee2 याने ते गाणे अपलोड केलेले आहे.
http://www.youtube.com/watch?v=vsziuRkqLdU
अश्या ह्या बायका
खालुन आत्ता भाजी घेवुन येते म्हणणारी बायको अर्धा-पाऊण तास झाला तरी घरी उगवत नाही याची काळजी वाटायला हवी की भुकेल्या पोटी पित्त खवळले पाहिजे ?
उगवली शेवटी येकदांची.
"कुठे होतीस इतका वेळ ? "
"खालच्या मजल्यावर एकाकडे एक आजीबाईं छानशी गाणी ऐकुन दाखवत होत्या, लिफ्टमधुन वर येतांना ते ऐकु आले, मग .. "
पुढचे वाक्य ऐकायला राजाभाऊ थांबतात कशाला ? ते पोचले तडक तिसऱ्या मजल्यावर. त्यांच्या फर्माईशी ऐकुन त्या अनोळखी आजींनी त्यांना चारपाच गाणी ऐकवली.
या वयात देखिल कोणतीही साथ नसता येवढी सुरेल गाणी !, गळाही लताच्या जातीचा.
मजा आली.
उगवली शेवटी येकदांची.
"कुठे होतीस इतका वेळ ? "
"खालच्या मजल्यावर एकाकडे एक आजीबाईं छानशी गाणी ऐकुन दाखवत होत्या, लिफ्टमधुन वर येतांना ते ऐकु आले, मग .. "
पुढचे वाक्य ऐकायला राजाभाऊ थांबतात कशाला ? ते पोचले तडक तिसऱ्या मजल्यावर. त्यांच्या फर्माईशी ऐकुन त्या अनोळखी आजींनी त्यांना चारपाच गाणी ऐकवली.
या वयात देखिल कोणतीही साथ नसता येवढी सुरेल गाणी !, गळाही लताच्या जातीचा.
मजा आली.
Tuesday, April 06, 2010
हॉटेलने आम्हाला खाल्लं ?
वपुंच्या "महोत्सव" मधे एक वाचलेले एक वाक्य चांगलेच पटले.
" आम्ही ह्या हॉटेलमधे खाल्लं की हॉटेलने आम्हाला खाल्लं ? "
असा अनुभव काही वेळा येतो खरा. भरमसाठ पैसे मोजुनही समाधान मिळत नाही.
वरळी नाक्यावर असलेल्या ( आता हे बंद पडलयं )" व्हिवा पश्चिम " ची बऱ्याच वर्तमानपत्रात तारीफ वाचलेली होती. कदाचित हे हॉटॆल सेलेब्रेटींचे असल्यामुळे हि तारीफ असावी.
१०-१२ वर्षे उलटुन गेली तरी अजुन तेथले तथाकथीत मराठी खाद्यपदार्थ व त्यांने खिशाला भलेमोठे भोक पाडलेले बील अजुन आठवतयं.
या बिलात अख्खं कुटुंब महिनाभर जेवले असते.
मोगरा फुलला: मराठी ब्लॉगर्स स्नेह मेळाव्याची नाव नोंदणी आता ४ मे २०१० पर्यंत!
मोगरा फुलला: मराठी ब्लॉगर्स स्नेह मेळाव्याची नाव नोंदणी आता ४ मे २०१० पर्यंत!
मुंबईबाहेरुन या स्नेहमेळाव्याला येणाऱ्यांची जर मुंबईत रहाण्याची सोय नसेल , तर त्यांचे माझ्या घरी स्वागत आहे.
इमारतीचे दुरुस्तीचे काम सुरु आहे, थोडीशी गैरसोय होईल. पण चालण्यासारखे असेल तर माझ्याशी संपर्क साधावा.
मुंबईबाहेरुन या स्नेहमेळाव्याला येणाऱ्यांची जर मुंबईत रहाण्याची सोय नसेल , तर त्यांचे माझ्या घरी स्वागत आहे.
इमारतीचे दुरुस्तीचे काम सुरु आहे, थोडीशी गैरसोय होईल. पण चालण्यासारखे असेल तर माझ्याशी संपर्क साधावा.
वाटलं की
थोडावेळ वाटत होत आपण गोव्यात तर नाही ना. कुठे तेवढे आपले नशीब चांगले ?
आम्ही मारे आपले उन्हाची काहीली सहन न होता मग त्यावर आपले थातुरमातुर उपाय करु लागतो, कुठे उसाचा रस पी, कलींगड खा, ताक पी, पन्हे , कोकम सरबत, वाळा घातलेले माठातले सुवासेक पाणी पी, जिबुड, संत्र खा.
आम्ही मारे आपले उन्हाची काहीली सहन न होता मग त्यावर आपले थातुरमातुर उपाय करु लागतो, कुठे उसाचा रस पी, कलींगड खा, ताक पी, पन्हे , कोकम सरबत, वाळा घातलेले माठातले सुवासेक पाणी पी, जिबुड, संत्र खा.
दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ
थोरला म्हणतो मीच तुमचा रक्षणकर्ता, राजाभाऊंनी मान डोलावली. खरं आहे. पटले तुमचे. तेवढ्यात धाकटे म्हणाले, तुमच्या कैवाराचा मक्ता मी घेतला आहे, मोठ्यांच्या राज्यात तुमचे काही निभावत नाहीयं, राजाभाऊंनी मान डोलावली. बरोबर आहे तुमचे म्हणणे अगदी खरं आहे, पटले मला. थोडक्यात काय तुमचे बरोबर आणि तुमचेही बरोबर, आपण कशाला कोणची बाजु घ्यायची.
पण दोघांमधला धाकटा हुशार हो. आतापर्यंत हे दोघे फक्त काळजाला हात घालत होते.
धाकट्याने आता एकदम पोटापर्यंत धाव घेण्याचे ठरवले.
नुसता वडापाव खावुन खावुन किती वर्षे खाणार तुम्ही ? परत त्यात आता त्यातली लसणाची चटणी पण तिखट राहिलेली नाही, जिभेची काय आग होत नाही, मन काही पेटता पेटत नाही, आता असा हा बिनतोड सवाल विचारल्यावर आणि मग त्यातुन हा असा आता पोटाचाच प्रश्न निर्माण झाल्यावर हे असे तटस्थ रहाणे राजाभाऊंना जड जावु लागले.
लोण्याचा गोळा मटकावयाला हा बोका पुढे सरसावला आहे .
राज ठाकरे यांनी अंधेराला महाराष्टीय खाद्यमहोत्सव जो आयोजीत केला आहे त्याला ते २४ एप्रिलला जाणार आहेत.
अशी कोलांटीउडी मारणॆ बरे नव्हे हो राजाभाऊ.
इ बंबईनगरीया है देख बबुआ
एकीकडे सातरस्ता, लोअरपरळ, परळ, लालबाग विभागात उत्तुंग टोलेजंगी टॉवर उभे रहात आहेत, पण दिव्याखाली अंधारच आहे.
ह्यांचे सारे व्यवहार अगदी भर रस्तावर चालतात. बाजुने भरधाव वेगात वहाने येतजात असतात , पण ह्यांना त्याचे काय, सारेच अंगवळणी पडलेले.
दोन वर्षापुर्वी पुण्याला धायरीमधल्या धारेश्वराच्या अंगणात बहरलेला हा बहावा,
ऐसा बहार पुन्हा पहाणे नाही. हे झाड तसे छोटॆसे आहे, कसा काय त्याने येवढा हा लुभावणारा भार पेलला असावा ?
Monday, April 05, 2010
काफे मैसूर , काकडी डोसा आणि टॉमेटो रसम
राजकारणात पक्षप्रती असलेली आपली निष्ठा हे राजकारणी लोक अगदी सहजच बदलतात, मग या प्रंतप्रधानाने तरी या निष्ठापालटु खेळात मागे रहावे ? http://foodateachglance.blogspot.com/2010/03/blog-post_27.html
आतापर्यंत माटुंग्याला गेल्यावर राजाभाऊंची निष्टा केवळ "रामाश्रय " च्या प्रती वाहिलेली होती.
पण हल्ली राजाभाऊंचे मन त्या रामाश्रयात फारसे रमत नव्हते. तेव्हा त्यांनी मग आपली पार्टी बदलायचे ठरवले. तसा त्यांचा माटुग्याचा खाद्यप्रवास कॅफे मद्रास पासुन सुरु झालेला मग तसे अधुन मधुन इडली हाऊस, मणी ( रुईया जवळाचा तसेच शंकरा मठाजवळील ), मधे ते भेट देत असत. पंण निष्ठा एकाच ठिकाणी.
आज ते काफे मैसुर मधे गेले. खरं म्हणजे त्यांची आज नीर डोसा किंवा रवा डोसा खाण्याची इच्छा होती. आयत्या वेळी बेत बदलला आणि मग राजाभाऊंनी एक प्रयोग करायचे ठरवले. दोन परस्परविरोधी चवीचे पदार्थ मागवायचे.
गरमागरम तिखट रसम, टॉमेटो रसम आणि गोड काकडी डोसा.
हे सारे राजाभाऊंसाठी नव्हे .
हे एक दाक्षिणात्य खाद्यपदार्थ मिळणाचे दर्जेदार उपहारगृह आहे
जगी सर्व सुखी असा कोण आहे. ?
विस्तारलेला वटवृक्ष, त्या खालचा हा पार, शितल छाया, तापलेले ऊन, पानातुन झिरपत झिरपलेले ऊन, तप्त सुर्य, भाजुन काढणारी दुपार, वहाणारे गरम वारे, आणि त्याच्या छत्रछायेखाली सुखावलेले हे चार पांथस्त.
या क्षणीतरी त्यांच्या सारखे सुखी तेच.
बहुत कठीण है डगर पनघटकी । अब क्या भर लावु मै जमनासे मटकी ॥
एकीकडे धारेश्वराच्या देवळातली पाणी भरुन वहात राहिलेली पाण्याची टाकी. पाणी भरभरुन वहातयं, वाया जातयं आणि दुसरीकडॆ त्या चढणावरुन घरच्यासाठी पाणी भरणाऱ्या या दोन चिमुरड्या.
Sunday, April 04, 2010
डहाणुकर कॉलनी आणि बहावा
नवसह्याद्रीत आणखी भटकायची की कसं , याचा विचार करत असतांना राजाभाऊंची बायको त्यांना म्हणाली "चल ताईकडे जाऊया ."
फुले बघण्याच्या मुडमधे असतांना नातेवाईकांकडॆ ? तेवढ्यात त्यांना आठवले गौरीताईंनी Gouri http://mokale-aakash.blogspot.com/ डहाणुकर मधे बहाव्याची अनेक झाडॆ असल्याचे त्यांना मागे सांगितले होते. मग काय.
आयुष्यात कधीतरी बायकोचे ऐकण्यात शहाणापणा असतो. कधी कधी तिचे ऐकावे. अजुन बरीचशी झाडे येथे बहरायची आहेत.
या डहाणुकर मधे झाडांवर काय काय प्रकारची फुले येतात.
फुले बघण्याच्या मुडमधे असतांना नातेवाईकांकडॆ ? तेवढ्यात त्यांना आठवले गौरीताईंनी Gouri http://mokale-aakash.blogspot.com/ डहाणुकर मधे बहाव्याची अनेक झाडॆ असल्याचे त्यांना मागे सांगितले होते. मग काय.
आयुष्यात कधीतरी बायकोचे ऐकण्यात शहाणापणा असतो. कधी कधी तिचे ऐकावे. अजुन बरीचशी झाडे येथे बहरायची आहेत.
या डहाणुकर मधे झाडांवर काय काय प्रकारची फुले येतात.
विशु व पॅरेडाईज व भल्या माणसा धीर धर रे धीर धर.
नवसह्याद्री मधला बहरलेला अमलताश एकदा बघुन समाधान न झालेले राजाभाऊ परत दुसऱ्या दिवशी त्याचे डोळे भरभरुन दर्शन घ्यायला गेले, बाजुच्या रस्तावरील नीलमोहर ही बघायचा होता.
सुरवात केली सिंहगड रस्तावरील सारदा मठातुन. मठाच्या आवारातही एक बहावाचे छानसे झाड आहे, ते ही आता बहरु लागलय. त्यांच्या हाती आणखी एक रत्न या मठात लागले. येथे "पॅरेडाईज "ची बरीच झाडॆ आहेत. कालच्याच लोकसत्तामधे त्याचा फोटो आला आहे.
मग राजाराम पुलावरुन स्वारी त्यांच्या मॅडम सवेत नवसह्याद्रीत वळली. वाटॆत त्यांना एका फळवाल्याकडे गुलाबी पेरु मिळाले.
रस्तावरच्या सुरवातीचे पेल्टाफोरम चांगलेच फुलुन आले आहेत. पण कशी निसर्गाची किमया असते . येथे ओळीने तीन बहावाची झाडे आहेत. मधल्या झाडाला आपला बहार आवरता आवरत नाहीत , आणि बाजुचे दोघे ! अजुन ही प्रतिक्षेत आहेत, निसर्ग कधी आपल्यावर जादुची कांडी फिरवतो याची.
या निष्पर्ण , निष्फुली बहाव्याला पाहिल्यानंतर मन जरासे व्यथीत झाले.
त्याला म्हटले " का रे बाबा काय झालयं तुला, का असा उदास ? "
बहावा हळुच डोकावत म्हणाला "धीर धर, भल्या माणसा धीर धर "
सुरवात केली सिंहगड रस्तावरील सारदा मठातुन. मठाच्या आवारातही एक बहावाचे छानसे झाड आहे, ते ही आता बहरु लागलय. त्यांच्या हाती आणखी एक रत्न या मठात लागले. येथे "पॅरेडाईज "ची बरीच झाडॆ आहेत. कालच्याच लोकसत्तामधे त्याचा फोटो आला आहे.
मग राजाराम पुलावरुन स्वारी त्यांच्या मॅडम सवेत नवसह्याद्रीत वळली. वाटॆत त्यांना एका फळवाल्याकडे गुलाबी पेरु मिळाले.
रस्तावरच्या सुरवातीचे पेल्टाफोरम चांगलेच फुलुन आले आहेत. पण कशी निसर्गाची किमया असते . येथे ओळीने तीन बहावाची झाडे आहेत. मधल्या झाडाला आपला बहार आवरता आवरत नाहीत , आणि बाजुचे दोघे ! अजुन ही प्रतिक्षेत आहेत, निसर्ग कधी आपल्यावर जादुची कांडी फिरवतो याची.
या निष्पर्ण , निष्फुली बहाव्याला पाहिल्यानंतर मन जरासे व्यथीत झाले.
त्याला म्हटले " का रे बाबा काय झालयं तुला, का असा उदास ? "
बहावा हळुच डोकावत म्हणाला "धीर धर, भल्या माणसा धीर धर "
Saturday, April 03, 2010
आंबेवाले कार्लेकर
आले बरे का देवगडचे आंबे मुंबईत आले.
गेल्या काही वर्षात आंब्याच्या व्यापाऱ्यांनी, दलालांनी, आणि विक्रेत्यांनी हा सम्राटाचे अवमुल्यन करुन टाकले आहे. पैश्याच्या लोभाने कोवळे फळ लवकर झाडावरुन उतरवणॆ, कॄत्रीम रसायनांचा मारा करुन ते अकाली पिकवणॆ, व काळॆ पडलेले, सुरकुतलेले, न बघवणारे रसहीन, गंधहीन फळ चढ्या दरात अज्ञानी ग्राहकाच्या गळी उतरवणॆ असे प्रकार.
आणि मग या परिस्थितीत असली, रुचकर, चविष्ट, सुवासीक आंबे, बागेतुन थेट ग्राहकांपर्यंत पोचावे यासाठी अनेक ठिकाणी आंबा महोत्सव भरवण्यात येवु लागले.
तीन एक वर्षापुर्वी अशाच एका आंबा महोत्सवात आमची गाढ पडली देवगढच्या सौ. मुग्धा कार्लेकरांशी , आणि उत्तम दर्जाचे, अस्सल, ओरीजनल आंबे खाण्यासाठी शोध घेत रहाण्याचा आमचा प्रवास तेथे संपला. आता इतरत्र कोठेही बेभरवश्याची बोली करण्याचे प्रयोजनच राहीले नाही. जे फळ हवे होते, जसे हवे होते ते मिळाले.
मग आता दरवर्षी मार्च महिना आला की वेध लागतात केव्हा एकदा केव्हा बरे सौ. मुग्धा कार्लेकर मुंबईत आंबे घेवुन येणार याचे.
सौ. मुग्धा कार्लेकरांनी मुंबई मधे चक्क दुकान घेतलय , दादरला, गोडबोले स्टोयरच्या बाजुला, कॅनरा बॅंके समोर, वैद्य रोडवर .
मग काय . छातीत दुखत असतांना त्याकडे दुर्लक्ष करत झाली खरेदी.
आणि आता काय पुढील दोन महिने नुसते मनोसक्त कार्लेकरांच्या आंब्यांचा आस्वाद घेणॆ.
तेव्हा मग
Friday, April 02, 2010
अमलताश
"थांबवा, थांबवा, मागे वळवा "
राजाभाऊ खुप जोरात मोठ्यांने रिक्षावाल्यावर उत्तेजित होत ओरडले. क्षणभर त्यांना व राजाभाऊंच्या बायकोला कळेना काय झाले असावे ?
"उजवी कडे गल्लीत गाडी वळवा."
गाडी वळली आणि ....
ज्यांच्या दारी किंबहुना खिडकीत हे निसर्गाचे देखणे, सुंदर ऐश्वर्य फुलले आहेत ती माणसे किती नशिबवान म्हणायला हवी. या बहरलेल्या बहावाच्या सानिध्यात ह्या दिवसाचे सोने होत असेल.
युनायटेड वेस्टन सोसायटी. नवसह्याद्री, पुणे येथला हा बहावा.
येथे नीलमोहरही गच्च फुलुन राहिले आहेत
तर मा. मुख्यमंत्रांचे टायमींग चुकले तर
त्याची वेळ चुकली म्हणायची. त्यांनी अभिव्यक्तीस्वातंत्र वर असलेल्या परिसंवादाऐवजी मंगेश पाडगावकरांच्या कार्यक्रमाला यायला हवे होते.
"प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते , तुमचे आमचे सेम असते "
साऱ्यांना कसे प्रेमाचे भरते येवुन राहिले होते. अश्या वातावरणात कोणाला जहाल बोलावेसे वाटॆल ?
आता या कार्यक्रमामधे मंगेश पाडगावकरांचा काहीसा तोल सुटला होता खरा, पाडगावकर आजोबांशी लहान मुलांच्या गप्पा असे हे कार्यक्रमाचे स्वरुप आहे, पुढे लहान लहान मुले बसलेली आहेत याचा त्यांना अनेकदा विसर पडला हे खरे, मग वयात आलेल्या मुलीचे वर्णन " All of sudden everything " वगैरे. काहीसे ते वहावत गेले. होता है होता है.
पण वहावत गेलेल्या पत्रकारांच्या टिका ऐकण्यापेक्षा ही फुले अंगावर घेणॆ किती तरी पटीने बरं की.
Thursday, April 01, 2010
तर मुख्यमंत्रांना जोड्याने हाणु.
कोणे एके काळी "सिंहासन" चित्रपटात, कादंबरीत डिकास्टाच्या तोंडाचे हे वाक्य ऐकुन जीव थरारला होता. एका राज्याच्या प्रमुखाला, सर्वात शक्तीशाली व्यक्तीला , मुख्यमंत्राला हे तोंडावर सांगण्याची ही हिम्मत ? केवढे जबरदस्त वाक्य ते वाटले होते त्या काळी.
आणि आता, काळ बदलला. साहित्य संमेलनात आपला नियोजीत कार्यक्रम बदलुन आदल्या दिवशी मुख्यमंत्री आले खरे , पण त्याचा त्यांना नक्कीच पश्चाताप झाला असणार. ही पत्रकार मंडळी, लेखक मंडळी त्यांना शालजोडीतले तर जावुंद्या, उघड उघड हाण हाण हाणात होती. मुख्यमंत्रांना तोंड दाबुन बुक्काचा मार. एकाचा तर चक्क तोल सुटला होता, आपल्याला नक्की काय बोलायचे आहे याचे भान न रहाता ते गृहस्थ मधेच त्यांची स्तुती करत होते, मधेच शिव्या घालत होते.
अभिव्यक्तीस्वातंत्रावर चर्चा असली तरी येवढे स्वातंत्र काही खरे नव्हे. जेव्हा खरोखरच बोलायची वेळ असते तेव्हा बोललेच जाते असे नाही.
राजकारणी माणसांना शिव्या देण्याची जणु फॅशनच होवुन गेली आहे.
काका , काका मला वाचवा
काका. हा नुसता शब्द उच्चारला की " काका काका मला वाचवा " ची आरोळी आठवतेच, ते गारदी नंग्या तलवारी घेवुन नारायणरावांच्या मागे लागल्याचे दृश्य डोळ्यासमोर तरळु लागते.
( हल्लीच्या युगात काकांनाच पुतण्यापासुन वाचवण्याची वेळ आली आहे ती बात वेगळी. )
नाती काय काकापुतण्यांचीच असतात काय ?
जेव्हा तुमची पुतणी "काका " , "काका " करत, तुम्ही नुसते तिच्या नजरेसमोर पडायची खोटी, तुमच्या कडे झेपावतो तो क्षण आयुष्यामधला खरा. बाकी सारे झुट.
Subscribe to:
Posts (Atom)