Thursday, July 21, 2022

कोकणास्थ, कोकणस्थ आणि कोकणास्थच.

 कोकणास्थ, कोकणस्थ आणि कोकणास्थच.

अप्रतिम. निव्वळ अप्रतिम. साधे आणि रुचकर, घरगुती आणि चविष्ट जेवण. राजाभाऊ आज मनापासुन सुखासमाधानाने जेवले हो. आज सकाळी ते उठले तेव्हा त्यांच्या ध्यानीमनीही नसेल आपल्या नशिबी आज येथले भोजन जेवायचे असेल. 

छोले आणि राजाभाऊंना जशी हवी असते अगदी तशीच बटाटा भाजी. उत्तम डाळ आणि सर्वोत्तम भात, सोबत काकडीची कोशींबीर, चटणी, लोणचे आणि वरती श्रीखंड सुद्धा. 

आणि ह्या साऱ्यांची लज्जत वाढवायला म्हणुन मऊ , मुलायम गरमागरम तांदळाची भाकरी आणि बोनस मिळालेले वडे. 

"कोकणस्थ " राजाभाऊंना खुप भावलयं हे मात्र बरीक खरं.  

एका मराठी कुटुंबाचे हे उपहारगृह. स्वःत जेवण करुन वाढणारे.  अजिबात कमर्शियल नसलेले.

राजाभाऊंना सुरवातीला जी भीती वाटत होती की आजुबाजुच्या शेट्टी लोकांच्या बार व रेस्टॉंरंटच्या गराड्यात हे कितपत तग धरेल याची जी आता निरर्थक वाटायला लागली आहे.

आता बेत पुढच्या रविवारचा बहुदा ठरतोय. खास काळेआजोबांसाठी. ते येथे नक्कीच मासांहाराची मजा लुटतील.





No comments: