Saturday, February 21, 2009

रातभर मोहे सोने ना दे

या Lu Lin ने फार परेशान करून ठेवलय. काल रात्रभर झोपुन दिले नाही । बदमाश कुठे दडलाय कळायला मागत नाही। तसा त्याचा पत्ता कळलाय, शनी आणि चित्रेच्या मधे कुठेतरी तो आहे आणि द्विनेत्रीनेच दिसतोय। अस्पष्ट्सा ।

रात्री १ वाजेपर्यंत शोधत होतो, परत पहाटे ४ वाजता उठून ,

बघुया आज तरी दिसतोय काय ? २४ तारखेस तो शनीच्या अगदी जवळ असणार आहे तेव्हातरी तो शोधायला अवघड जावु नये।

काल रात्री माझ्या गुरुवर्यानी त्याचे वसई पासून जरा लांब जावुन दर्शन घेतले , पण येथे पुण्यामधे आकाशात फारच उजेड असतो, त्यामुळे पण त्याला शोधायला अडचण येत आहे ।

No comments: