Sunday, January 27, 2008

श्री. अंबुमणी रामादोस व श्री. टी. चंद्रशेखर

राजकारणी माणसांना, नेत्यांना ,मंत्रांना आपण नेहमीच नावे ठेवत आलो आहोत, त्यांना हसत असतो, त्यांच्याबर टिका करत असतो, परंतु एखादा मंत्री खुप चांगले निर्णय घेत असेल तर त्याला पाठीबां देणाऱ्यांची संख्या फार सीमीत असते.

धुम्रपान विरोधी कायदे कडक करणारे, त्याचा आरोग्यावर होणारा विपरीत परीणामासंबधी जनजागॄती वाढवण्याचा प्रयत्न करणारे श्री. अंबुमणी रामदास यांच्या पाठीशी आपण किती बरे उभे राहीलो ? किती बरे त्यांना या मोहीमेत साथ दिली ?

सरकारी इमारतीत व तिच्या आवारात, सार्वजनीक ठिकाणी ध्रुमपान बंदी, कार्यालयात ध्रुमपान बंदी, चित्रपटात नटनट्यानी पडद्यावर ध्रुमपान करु नये या साठीचे त्यांचे प्रयत्न.

आरोग्यमंत्रांचे काम खरोखरीच कौतुकास्पद आहे.

(एक गोष्ट मला नेहमीच खटकते सरकारी इमारतीच्या आवारात, सार्वजनीक ठिकाणी ध्रुमपान बंदी जरी असली तरी तिच्या आवारात सिगरेट्सच्या विक्रीवर काहीच पाबंध नाही का ? बहुदा नसावाच. असता तर त्या शासकीय आवारात ही विक्री झालीच नसती )

हीच गत श्री. टी. चंद्रशेखर यांची झाली आहे. ठाण्याच, नागपुरचा कायापालट करणाऱ्या श्री. टी. चंद्रशेखर यांना अखेरीस मुंबईत सरकारी नोकरीचा राजीनामा द्यावा लागला.

दुर्दैवांने कोणाकडुन ही एक साधा निषेधाचा सुर उमटला नाही.
ठाण्यामधे त्यांना जसा कठोरपणे वागुन शहराचे प्रश्न सोडवतांना मिळालेला सर्वसामान्यांपासुन ते नेत्यांपर्यंतचा पाठीबा मिळाला तो मात्र त्यांना मुंबईत मिळाला नाही.
एका पर्वाची अखेर झाली.
TOI: Concerned over the impression they leave on youngsters when they smoke on silver screen, Union Health Minister Anbumani Ramadoss has urged Bollywood mega stars Amitabh Bachchan and Shah Rukh Khan to desist from smoking in their films.
"The movies are most responsible (for encouraging smoking). When I said movies should not have smoking scenes we have statistics which show that 52 per cent of children have their first puff of a cigarette because of movie celebrities," he said.
Questioned on his pet theme of pictorial warnings on cigarette and bidi packets, he said, "I am sure they would be very effective. All this time we have been saying things to people.
But I believe it is now time to scare them. "In contrast to developed countries where tobacco incidence is going down, in India, it is going up frighteningly," the minister said.

2 comments:

Vaishali Hinge said...

हीच गत किरण बेदीची झाली....
एका स्री च्या हातात दील्ली दीली गेली नाही , राजिनामा स्विकारला गेला... कुणिही काहीही आवाज उठवला नाही.(राजिनामा स्विकारणारे आनंदाने तीच्या स्वभिमानाला हसले मात्र असतील..) मला तर कधीकधी वाटते.. की भरतीय निष्क्रिय जनता ... सगळ्याला कारणीभुत आहे..

HAREKRISHNAJI said...

खर आहे. जनता तिच्या मागे उभी राहीली असती तर. नाही चीरा, नाही पणती अशी तिची गत करुन ठवली आहे. अविनाश धर्माधिकारी यांची सुद्धा हिच गत झाली .