Thursday, January 03, 2008

स्वभाव

काही जणांचे बोलणे किती मधाळ असते, मुखी जणु खडीसाखर, ते किती गोड बोलतात, लाडे , लाडे, फारच लाघवी. ऐकत रहावेसे वाटते त्यांचे ते बोलणे व ते दिलखुलास हास्य.

पण जरासे तटस्थ राहुन न्याहाळले असता जाणवते हे सारे त्यांच्या भात्यातले हुकमी बाण, विशिष्ट वेळी, खास माणसांकडेच , जेव्हा जेव्हा त्यांचा स्वार्थ दडलेला असतो, तेव्हा तेव्हा हे त्यांच्या भात्यातुन बाहेर काढले जातात. मग त्यातली कॄत्रीमता जाणावायला लागते, त्यांची वस्तादगीरी कळू लागते.

मतलब की दुनीया है रे भाई.

तर काहीचे बोलणे फणसासारखे. काटेरी. फणस म्हणुन घ्यायला त्यांना काय अहंकार वाटतो.

कस व्हायच !!

2 comments:

आशा जोगळेकर said...

पण अनेकदा अशा फणसांच्या पोटी रसाळ गरे असतात.

HAREKRISHNAJI said...

आशाजी,

मला ही हेच म्हणयचय. जे मनात आहे तेच बाहेरही असायला हवे असे मला वाटते. सरळपणा, स्पष्ट्पणा, नितळपणा, अंतर्बाह्य माणासाने एकच असावे, मनात रसाळ गरे बाळगत बाहेरुन आपण काटॆरी पणा का करावा .