पुण्याला पोहोचल्यावर राजाभाऊंनी फेसबुक उघडले आणि "पुणे ईट आऊट " नामक ग्रुप उघडला. रिचर्स करण्यासाठी. पुण्यात जवळपास काय नविन रेस्टॉरंट आली आहेत का ते शोधण्यासाठी.
त्यात त्यांना ’नर्हे" मधले "ओ पुणे" हे रेस्टॉरंट सापडले. त्याचा रिव्हु उत्तम होता. मग काय राजाभाऊंच्याने रहावते काय ?
दुसऱ्याच दिवशी रात्री ते " ओ पुणे" येथे पोचले जेवण्यासाठी. प्रशस्त जागा, उत्तम अंतर्गत सजावट पहाता मन प्रसन्न झाले.
स्टार्टर्स मधे "पनीर रोझाली कबाब" मागवले. समोर आली उत्त्म सजवलेली डीश. पहाताच दिल खुष झाले. पनीर रोलमधे चीज टाकुन केलेली तंदुरी डीश. चव मस्त होती. आवडली. पण झाले काय की त्यानीच पोट भरले. मग काय पुढे काहीच मागवले गेले नाही. आणखी एक गोष्ट. पनीर जरासे तिखट वाटत होते. कदाचीत काळेकाका व काळेकाकुंना तिखट खाण्याची सवय नसल्यामुळे असेल.