Thursday, June 02, 2022

हिन्दु विश्रांती गृह

 मेरे प्यारे घरवासीयों , मै आज आपको एक मेरे "मन की बात कहने" जा रहा हुं. 

रविवार सकाळ. राजाभाऊ नऊ वाजता उठले. उठल्याउठल्या त्यांनी घरच्यांना आपल्या मन की बात सांगायला सुरवात केली.

"चलो आज चलते है , एक  नयी राह पर, एक नई दिशा लेकर, एक नई मंझील की तलाश मे , एक ऐसी जगा जहां पर कोई भी आदमी भुकाप्यासा ना रहेगा. उसे समाधान मिलकर ही रहेगा " 

"चल आज सकाळी पोळा मिसळ खायला जावु , मग दुपारी कोठेतरी बाहेर जेवु , संध्याकाळी मग "विनय हेल्थ होम " मधे उसळपाव, पातळभाजी पाव खावु "

जरा भावनेच्या भरात वहावुन गेलेल्या राजाभाऊंना मग उमजले, अरे आज आपण जरा जास्तच आश्वासने देत बसलो आहे. आपल्या ट्रेझरी मधे तर खडखडाट आहे आणि आपण तर काकुंच्या अपेक्षा भलत्याच वाढवुन ठेवल्या. 

काकुंनाही हा सारा दिवसभराचा बेत ऐकुन तेवढे बरे वाटले असेल, आजचा दिवस अच्छा दिन आहे म्हणायचे. चलो आराम करते है.

मग हळुहळु काकुंचा चांगल्या दिवसाच्या स्वप्नांचा चक्काचुर होवु लागला.  पैश्याचे निमित्त पुढे केले गेले. त्यांनी ही मग ते समजुन घेतले. होता है. होता है. असे तर नेहमीच होत असते, आता तर त्याची सवय झाली आहे.

पण आज राजाभाऊ फार दुष्टाव्याने वागले. ते एकटेच आज "हिन्दु विश्रांती गृह" मधे पोळा मिसळ खायला गेले, काकुंना "मिस्ती" ला सांभाळण्यासाठी बाहेर गाडीत बसवुन..

अखेरीस "पेट की बात" खरी.











No comments: