आज राजाभाऊंनी बढीया गाणॆ ऐकले. राग नंद आणि नायकी कानडा. दोन्ही राग आवडते. आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मधे "महाराष्ट्र ललित कलाकेंद्र" आयोजीत श्रीमती. श्वेता हट्टंगडी-किलपाडी यांचे गाणॆ होते.
पण त्या तिथे ते एक गडबड करुन राहिले. नेमके सोबत जी.ए.कुलकर्णींनी अनुवाद केलेले व कॉनराड रिक्टर ने लिहिलेले "शिवार " हे पुस्तक घेवुन गेले.
"आता खूप दूरवर रानात भूतांच्या मेणबत्या लागल्याप्रमाणॆ सूर्याचा शेवटाचा लालसर उदास प्रकाश होता. आता तोही पुसला गेला व रान एकदम काळवंडले ... "
अरे , येथे ही याच प्रहराचे राग , डोळे पुस्तक काही सोडवेना आणि कानाला काही गाणॆ ऐकल्यावाचुन राहवेना, सालं भलतचं त्रांगडे होवुन गेले. ही उर्मी फार वाईट असते.
बा मना, एका वेळी एकच काम कर रे, क्षणस्थ हो रे बाबा. आपल्या मनाला त्यानी दटवेले. एकावेळी दहा कामे करायला हे काही तुझे कार्यालय नाही. एकावेळी एकच.
मग पुस्तक सरळ मग पुढच्या खुर्चीवर ठेवुन त्यांनी गाण्याचा मस्तपैकी आस्वाद घेतला.
मेरो पीया ...
7 comments:
तुम्ही संगीताचे दिवाणे दिसता. सर्वप्रकारच्या कार्यक्रमांना उपस्थिती लावता. आणि आम्हाला कळवता. धन्यवाद/
साधक,
अभिप्रायाबद्द्ल धन्यवाद. जेवढ्या कार्यक्रमाला जातो त्याच्या पेक्षा हजार पटीने बऱ्याच कार्यक्रमाला जाणे राहुन जाते.काम ,काम आणि काम , त्यातुन वेळ काढणॆ खुप कढीण जाते.
हरेकृष्णजी, तुम्ही इंदौरचे का?
तुमच्या पोस्टमध्ये ‘बढीया गाणं’ वाचलं,आणि एकदम इंदोरला गेल्यासारखं वाटलं. संगीतामध्ये, खाण्यामध्ये, जगण्यामध्ये भरभरून रस घेणं आणि मनमोकळी दाद देणं ही इंदोरची खासियत तुमच्या ब्लॉगमध्ये जागोजाग दिसते.
"आता खूप दूरवर सभागृहात रागांच्या पणत्या लागल्याप्रमाणॆ नंदादीपाचा शेवटाचा लालसर उल्लहसित प्रकाश होता. आता तोही निसटून जाणार होता पण मनाने एकदम गाण्याचा मस्तपैकी आस्वाद घेतला ... "
क्षमस्व
गौरीजी,
नाही. मी इंदौरचा नाही. मी मुंबईकर. पण इंदौर हे आमच्या खास आवडीचे व जिव्हाळ्याचे स्थान. अनेक वेळा आम्ही येथे गेलो असु. काही काळ माझा भाऊ येथे नोकरी निम्मीत्ते होता. (पण त्या आधीपासुन आमचे येथे जाणॆ होते.) राजवाडा, सराफा, ५६ , मधुरम आणि अग्रवाल स्विटस, कोठारी मार्केट, ओम के नमकीन, छावनीतील मथुरा, आणि श्री माया. भरभरुन आम्ही इंदौरचा आस्वाद घेतला आहे.
या ब्लॉग मधे मी नेमके काय करत असतो हे मला अगदी मोजक्या जणांनी सांगीतले. धन्यवाद
योग,
जबरदस्त प्रतिक्रिया. जशी असायला हवी अगदी तशीच.
हरेकृष्णजी: गायिकेनी नायकी-कानडा गाताना 'मेरो पिया' या बंदिशीसाठी कुठला ताल निवडला होता? काही लोक ती तीनतालात गातात, कधी रूपकही वापरतात. एकताल किंवा तिलवाडा वापरत असल्यास त्याचेही आश्चर्य वाटायला नको.
प्रिय अनामिका,
माफ करा, मला सांगता येणार नाही. मला शास्त्रीय संगीता मधले काहीही कळत नाही.
मी फक्त ऐकण्यापुरता.
Post a Comment