Tuesday, July 08, 2008

गणपतीच्या उंचीवर मर्यादा

पर्यावरण रक्षणासाठी गणपतीच्या उंचीवर मर्यादा घालण्यात यावी तसेच गणपती विसर्जन समुद्रात करण्याऐवजी पर्यायी व्यवस्था करावी असे मत मुंबईच्या महापौर सौ. शुभा राऊळ यांनी व्यक्‍त करताच नेहमीप्रमाणेच राजकीय पक्षांनी गदारोळ घालायला सुरवात केली.

मुळात पर्यावरण म्हणजे काय हेच ज्यांना ठावुक नाही त्यांच्या कडुन यापेक्षा दुसरी काही प्रतिक्रीया अपेक्षीत करणे हा आपलाच मुर्खपणा आहे.

महापौरांच्या चांगल्या सुचनेला विरोध करणाऱ्यांना या उंच उंच गणेश मुर्तीचे समुद्रात कश्या रितीने विसर्जन केले जाते व दुसऱ्या दिवशी या मुर्त्यांची काय स्थिती असते ? त्या कश्या भग्न अवस्थेत चौपाटीला पडल्या असतात व त्यांची रवानगी अखेर कशी व कोठे होते ते दाखवायला नेले पाहीजे, त्यांच्या डोळयावर लावलेली झापडॆ दुर करुन व बंद असलेली मन उघडुन.


महापौरांना त्यांच्या विधायक कार्यात, या शहराच्या सुधारणॆसाठी त्या करत असलेल्या प्रयत्नात साथ देणे हे प्रत्येक विचारी नागरीकाचे कर्तव्य आहे.

1 comment:

प्रभाकर फडणीस P.K. Phadnis said...

झोपलेल्याला जागे करता येते. झोपेचे सोंग घेतलेल्याना कशी जाग येणार?