ओय काके
राजाभाऊ शेर तर त्यांचे चिरंजीव सव्वाशेर. एकेक जागा शोधण्यात पटाईत. फोर्ट मधल्या याझदानी बेकरीत बन मस्का, बृन मस्का खाण्यात राजाभाऊंचा जन्म गेला पण त्याच्या बाजुला असलेल्या ह्या "ओय काके " कडे त्यांचे फारसे लक्ष गेले नव्हते.
मग राजाभाऊंनी एके दिवशी त्यांचा सुपुत्र अस्सल पंजाबी जेवण जेवायला घेवुन गेला. येथे फक्त शाकाहारी जेवण मिळते. ही एक फारच दुर्मिळ गोष्ट आहे. पंजाबी म्हटले की कोंबडीची तंगडी आलीच पाहिजे. या रेस्टॉरंटची अंतर्गत सजावट मस्तच आहे.
इथले अमृतसरी छोले कुलचे फार आवडले. आणि पंजाबी म्हटले की लस्सी ही आलीच.
आता येथे हिंवाळ्यात सरसो का साग व मक्का दी रोटी खायला जायला हवे.
हे लिहित असतांना राजाभाऊंची अवस्था "देख देख मन ललचाये " सारखी होवु लागली. रात्रीच्याला येथुन जेवण मागवायची प्रबळ इच्छा मनात धरु लागली.
नवऱ्याच्या मनातल्या ह्या असल्या इच्छांना मोडता घालणे हे काळेकाकुंना चांगलेच जमते (अर्थात त्यांच्या मनात दुसरे काही चाललेले असते.) राजाभाऊंनी मग मान डोलावली. "घरी जेवण मागवण्यात काहीच अर्थ नाही. तेथे जावुन जेवण्यात मजा." हो ला हो.
ठिक आहे बचेंगे तो और भी खायेंगे.
No comments:
Post a Comment