Saturday, December 18, 2021

जो पर्यंत तुम्ही वाढुन वाढुन दमत नाहीत तो पर्यंत वाढा

 जो पर्यंत तुम्ही वाढुन वाढुन दमत नाहीत तो पर्यंत वाढा. - इती राजाभाऊ.

असच केव्हातरी एकदा रात्री राजाभाऊ मालवणी महोत्सवाला गेले होतो. दोन दिवस अंगात असलेला ताप उतरला होता. दोन दिवस जेवण बरोबर न गेल्याने ताप उतरल्यावर भुक खवळलेली. 

आता ह्या महोत्सवात साधं काय खाणार ? तोच राजाभाऊंची नजर मोदकपात्रावर पडली. 

मग काय, मारला मोदकावर ताव. 

राजाभाऊंच्या भल्यामोठ्या पोटामुळे असं वाटतं की "पहले पेट आता है बादमे राजाभाऊ !" तर काय अश्या ह्या उपाशी पोटात जे काही सुरवातीस उकडीचे मोदक खाल्ले ते  पोचलेच नाही, ते तर दाताच्या कैविटीमधे गायब झाले. 

राजाभाऊंना एकतर उकडीचे मोदक अतिशय परमप्रिय, त्यात ते उपाशी. स्टॉलवर पाठीमागे कुठेतरी हे किती खातात अश्या कोणीतरी केलेल्या शेऱ्याकडे साफ दुर्लक्ष करुन राजाभाऊंनी अजुन उकडीचे मोदक वाढायला सांगितले.

मोदक वाढणाऱ्या ताईंनी शेवटी विचारलेसच "अजुन किती देऊ? "

जो  पर्यंत तुम्ही वाढुन वाढुन दमत नाहीत तो पर्यंत वाढा. - इती राजाभाऊ.






No comments: