Saturday, December 18, 2021

मी मराठी

 "मी मराठी"

विलेपार्लेमधील काळे परिवार संचलीत "मी मराठी" मधे  दुपारी राजाभाऊ आपल्याच बायकोबरोबर, सहकुटुंब, सहपरिवार,  मराठी, महाराष्ट्रीय पध्दतीचे भोजन जेवायला गेले.

मटकीची उसळ, बटाटासुकी भाजी, पोळ्या, डाळ भात. सोबत लोणचे, दही आणि कोशिंबीर देखील.

या आपल्या मुंबई नगरीत खाण्यासाठी काय हवे ते मिळते. काय पायजे ते.

रस्तावरच्या गाडीवरील वडापावापासुन, गटारावर उभ्या असलेल्या गाडीवरील चायनीज, जैन चायनीज पासुन पंचतारांकीत हॉटेलातल्या देशीपरदेशी खाण्याच्या पदार्थापर्यंत.

पण खरच हवे ते मिळते का ?

हो. मिळते. फक्त एक गोष्ट सोडुन,

महाराष्ट्रीय पद्धतीचे भोजन, संपुर्ण जेवण. शाकाहारी थाळी.

थाळी  जेवणासाठी एका हाताच्या बोटावर मोजता येतील एवढीच दर्जेदार उपहारगृहे या मुंबईमधे आहेत 

ठाकुरद्वारचे सुजाता , गिरगावातील कोल्हापुरी चिवडा, दादरचे तृप्ती, आणि विलेपार्लेमधील मी मराठी.

बस्स , यादी संपली. 

गोरेगावचे "नेवैद्य" तर केव्हाच बंद झाले.

दुर्दैव राजाभाऊंच्या पोटाचे, दुसरे काय !

दादरच्या "आस्वाद" मध्ये थाळी मिळायला लागली आहे

No comments: