Friday, May 30, 2008

३१ मे, जागतीक तंबाखू सेवन विरोधी दिन


आपण ओढलेली प्रत्येक विडी-सिगरेट आपलं आयुष्य ११ मिनीटांनी घटवते.

आपल्याला हे ठावुक असते तरी पण आपल्याला धुम्रपान बंद करवत नाही. कॅन्सर पासुन अनेक रोग आपण आपल्या हाताने ओढवुन घेतो. का ? कशासाठी ?


कोणे एके काळी मी देखील चेन स्मोकर होतो. दिवसाला दोन मालब्रो सिगरेटची पाकीटे (४० सिगरेट ) संपवायचो.


मग एके दिवशी सुप्रसिद्ध लेखक व.पु.काळे माझ्या मदतीला आले, ज्यांच्यामुळे केवळ एका दिवसात धुम्रपान बंद झाले.

त्यांनी मला सांगीतले मी सिगरेट पिणे बंद करा असे सांगत नाही, सिगरेट पिणे वा‌ईट आहे हे ही सांगत नाही. वा‌ईट आहे ती सवय. सवय सोडा.

आणि मी सवय सोडली.

सुरवातीस नक्कीच त्रास होतो, शरीराला निकोटीनची आदत झालेली असते. ते त्याची मागणी करु लागते, मग प्रचंड नैराश्य येते, अगदी आत्महत्तेपर्यंत मनातले विचार घेवुन जातात. हे चारपाच दिवस उलटले, या दिवसात आपण आपल्या भुमीकेशी ठाम राहीलो, खंबीर राहिलो, की मग आपल्या मनाला शरीर साथ देवु लागते. आणि सवय सुटते.


तेव्हा केव्हा सोडताय सवय ??

Thursday, May 29, 2008

बेदरकारपणा



बसथांबा उभारण्यासाठी पदपाथावर भले मोठाले खड्डॆ खणुन आज दोन चार दिवस झाले असतील.

डोळस माणसे सुद्धा यात पडु शकतात, मग अंध व्यक्तींचं काय ?


सुरक्षततेबाबत आपण किती निष्काळजी, बेसावध, बेफीकीर, अज्ञानी असतो.

कुणाची सोय तर कुणाची गैरसोय


दुकानदारांची तक्रार रास्त आहे, या नव्या नवलाईच्या बसथांब्यांमुळे पाठीमागील दुकानदारांचे हवा, उजेड, बंद झाले आहे, जणु काही त्यांचे स्वातंत्र हिरावुन घेतल्यासारखे. त्यांची दुकाने या मागे साफ लपली गेली आहेत, त्यांच्या धंद्यावर याचा विपरीत परीणाम होवु शकतो.


दिवसभर बिचाऱ्यांना डोळ्यासमोर ग्राहकांऐवजी ह्याचा पत्राच नजर येतो.


त्यांची मागणी एकच, निदान हा मधला पडदा तरी हटवा, मोकळा श्वास तरी घेता येईल.

गुज्जर आंदोलन

समाजातील काही मुठभर घटक आपल्या मागण्याकरता सारया देशाला वेठिस धरतात, हिंसाचाराचें मार्ग अबलंबतात, आणि सारा समाज, देश , सरकार त्याकडे हतबल होवुन बघत रहातो ।
अश्या प्रकारचे आंदोलन ही दहशदावादीच्या कृत्या प्रमाणेच भयंकर असतात। सरकारने कोणावरही दयामाया न दाखवता ती आंदोलन त्वरित थांबवली पाहिजेत।

सैय्यां


काली काली रात रे दिल बडा सताये तेरी याद आये, तेरी याद आये
झुटोंसे प्यार किया हाय क्या किया सारे जहॉ क्या दुख ले लिया
अब रो रो प्राण जाये ।
काली काली रात रे दिल बडा सताये तेरी याद आये, तेरी याद आये
भीगी भीगी पलकोंकी लाज तेरे हाथ है

तु तो गया है तेरी याद मेरे साथ है
जो दिल को धीर बंधाये ।
काली काली रात रे दिल बडा सताये तेरी याद आये, तेरी याद आये

सज्जाद हुसेन नावक एक अवलीया होवुन गेला, सर्वश्रेष्ठ मॅंडोलीन वादक, लहरी, फटकळ, आपल्याच तोऱ्यात वापरणारा, "बागीचाये अफताल है दुनीया मेरे आगे" समजणारा, एक मनस्वी संगीतकार. अवघड चाली रचाव्यात तर त्यानीच, व त्या अवघड चाली गाण्याचे आव्हान पेलावे तर केवळ लतानीच.

नीट गा, तु सज्जादचे गाणॆ गात आहेस, नौशादचे नाही समजले का ! असे लताला ठणकवुन सांगण्याचे धाडस जगात फक्त एकाच माणासाकडॆ होते, सज्जद कडॆ. मग या स्वभावातुन होणाऱ्या परिणीतीची ना त्याला पर्वा होती ना जाणीव तो भला माणुस आपल्याच विश्वात रमलेला, सुंदर, मधुर चाली रचणॆ, आपल्याच त्या प्रसिद्ध ठेक्यात.

तो बाहेर फेकला गेला.

दुर्मीळ गाण्यांचा संग्रह करत असतांना त्या काळी केवळ दोन चित्रपटाची गाणी अतिशय दुर्मीळ होती. भारतात ती कोणाकडे आहेत हे फारसे कोणाला ठावुक नव्हते, माझा संग्रहक दोस्त श्री, प्रकाश कद्रेकर यांनी ती मिळवण्यासाठी जंग जंग पछाडले. या क्षेत्रातील दोन दिग्वज श्री नारायण मुलाणी व पुण्याचे उदय द्रविड हे देखील आमचे स्नेही. त्यांच्या कडे ही गाणी असावीत असा आमचा दाट संशय, पण ते देखील ताकास तुर लावुन देत नव्हते.
एकदा पुण्याला उदय द्रविड ला भेटायला गेलो होतो.

"तुम्हाला कळाले की नाही "
काय हो
" सैय्यांची कॅसेट H.M.V नी तीन महिन्यापुर्वी काढलीय.

जीव घेवुन मी दुकानात पळालो, कॅसेट मिळावण्यासाठी, सज्जाद साठी, लता साठी, दर्द भरी गाणी ऐकुन घेण्यासाठी.

ही त्या चित्रपटातील इतर गाणी.
किस्मत मे खुशी क्या नाम नही दो दिन भी हमे आराम नही
वो रात दिन
हवा मे दिल डोले , मचलकर बोले
उस पार एस दिवार के जो रहतो है
खयालो मे तुम हो नजारो मे तुम हो
मेरी जान मुहब्बत करो छुपके छुपके
काली काली रात रे दिल बाड सताये

आबा, हा सुर्य हा जयद्रथ

प्रिय आबा,

आपण सुरक्षततेच्या कारणासाठी सर्व दुचाकीवहान चालकांनी हेल्मेट वापरावे या साठी फेरी काढुन जनजाग्रुती केलीत, त्याला पुरते ४८ तास ही उलटले नाहीत.

सुरक्षततेसाठी प्रत्येक दुचाकी चालवणाऱ्यानी व त्याच्या मागे बसलेल्यांनी हेल्मेट घालायलाच हवे व ते कायद्याने बंधनकारक आहे.

Wednesday, May 28, 2008

भारतात फक्त २५६ सिंह शिल्लक - एक बातमी

म्हणुन कदाचीत आपल्या पराक्रमाच्या आठवणींसाठी शहरातील जंगलात त्यांच्या स्म्रुती जपुन ठेवावी असे महामानवाला वाटत असावे.


Tuesday, May 27, 2008

आबा, जरा आपल्या पोलीसांना हेल्मेट वापरायला शिकवा ना.


दुचाकी वहान चालवताना हेल्मेट न हालणॆ धोकादायक असते का हो ? व ते बेकायदेशीर देखिल आहे म्हणाता ? मग आपले मोटरसायकल स्वार बिट मार्शल पोलीस हेल्मेट बिना दिवसाढवळ्या भर रस्तावरुन कसे काय फिरत असतात ? बर हेल्मेट न घालता मोटरसायकलीवरुन फिरतात ते फिरतात परत वरती वहातुकीचे नियम ही मोडतात ! कुठुन ही कुठे कसे ही जाण्याचा यांना जणु परवानाच दिलाय. आपले ट्रॅफीक पोलीस मात्र हेल्मेट वापरतात हो. पण फक्त चालवणाराच. मागे बसलेल्याची हेल्मेट्च्या नावे बोंब असते हो.

आबा, जरा आपल्या पोलीसांना हेल्मेट वापरायला शिकवा ना.

आपल्या ट्रॅफीक पोलीसांनी आतापर्यंत किती बिट मार्शलांना या बेकायदेशीर कृत्या बद्दल पकडलय व त्यांच्या कडुन दंड वरुल केला आहे याची माहीती आपण मागवाल काय ?

अनेकदा मी स्वःता आपल्या पोलीसांना हेलेम्टविना मोटरसायकल चालवतांना पकडले आहे. माझ्या तोडांकडे बघुन ते निघुन तरी जातात नाही तर काही तरी सबबी तरी सांगतात.

आबा, माझा मुख्य मुद्दा असा आहे की कायद्याच्या रक्षकांनी सर्वप्रथम कायदा पाळला पाहीजे. निदान स्वःताच्या सुरक्षत्तेसाठी तरी.

आपल्या मोटरसायकल फेरी पासुन बोध घेत आता तरी सर्वजण सुरक्षततेसाठी हेल्मेट वापरायला लागतील ही आशा.

म. टा. प्रतिनिधी - एरवी सायरन वाजवत जाणाऱ्या लालदिव्यांच्या मोटारी आणि मागेपुढे पोलिसांच्या जीपमधून दौरा करणारे आर. आर. पाटील आणि छगन भुजबळ यांनी सोमवारी ऐन मुंबईत मोटारसायकल सफारीचा आनंद लुटला. लेडीज बारवरील धाडींवरून आपले राज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे यांच्याशी झालेला वाद विसरून आबा चक्क त्यांच्या मोटारसायकलवर मागे डबलशीट बसले. मग सरकारी मोटारी बाजूला ठेवून बाइकस्वार बनलेल्या मंत्र्यांना पाहण्यासाठी मुंबईकरांनी गर्दी केली खरी, पण या खाशा सवाऱ्यांमुळे मरिन ड्राइव्हची वाहतूक मात्र कोलमडली.. हेल्मेट सक्तीचा संदेश देण्यासाठी मुंबईच्या वाहतूक पोलिसांनी एनसीपीएपासून गिरगावच्या चौपाटीपर्यंत मोटारसायकल रॅली आखली होती. वाहतूक पोलिसांच्या सुमारे शंभर मोटारसायकलींचा ताफा व त्यावर हेल्मेटधारी पोलिस अशी ही रॅली होती.

Sunday, May 25, 2008

कल के कलाकार संगीत महोत्सव - दिवस अखेरचा




आजच्या शेवटच्या दिवशी एकीकडे भोपाळ वरुन आलेल्या सौ.सुलेखा भट, औरंगाबादच्या डॉ.वैशाली देशमुख यांचे सुरेख गाणे, कोलकोताच्या सौरवब्रता चक्रबोरती यांचे ऐकायला दुर्लभ असलेले असे वाद्य, "सुरबहार " वादन हे अप्रतिम कार्यक्रम ऐकल्याचा हर्ष व दुसरीकडे त्याच बरोबर "कल के कलाकार संगीत महोत्सव" संपल्याचे दुःख अशी काहीशी विचीत्र मनस्थिती.



तरुण पिढी किती गुणी आहे.



आयोजकांची नेहमीचीच रड. लोकांपर्यंत हा संगीत महोत्सव पोचवायला ते कायमचे कमी पडतात.



एका ही वर्तमानपत्रात यासंबधी काहीही लिहुन येत नाही. या मुळे हे गुणी कलावंतांना हवी तशी प्रसिद्धी मिळत नाही, त्यांच्या गुणांचे योग्य ते कौतुक केले जात नाही, अनेक रसिक या कार्यक्रमापासुन माहीती नसल्यामुळे वंचीत रहातात ही खंत.

वॉटर कलर्स - पुष्पा बगरोडिया

निसर्गात रमणाऱ्या अवलीयांनी जरुर पहायला जावे. पुष्पा बगरोडिया यांनी वॉटर कलर्स या माध्यमातुन निसर्गाची विषेशःता फुलांची चित्रे काढलेले चित्रपदर्शन सध्या नेहरु सेंटर मधे भरले आहे.

चित्रांची एक झलक.

कर्नाटक विधानसभा - निकाल

कर्नाटक विधानसभाच्या निवडणुकीच्या निकालाने एका घराणेशाहीचा पार निकालच लावला. कर्नाटकी जनतेने यंदाला फारच चांगले काम केले. सोचविचार करुन देवीगौडा पितापुत्रांची नौंटंकी संपवुन त्यांना सध्याच्या राजकारणातरी त्यांना होत्याचे नव्हते केले. हे फार बर झाल.

पंतप्रधान पद भुषविल्यानंतर ही ज्या गृहस्थांनी गल्ली मधले व ते ही विधीनिषेध शुन्य राजकारण करण्यात धन्यता मानली, त्यांची सरंजमशाही संपवण्यासाठी हे जनतेने योग्यच केले.

Saturday, May 24, 2008

दुर है म़झील राहे मुश्कील

दुर है म़झील राहे मुश्कील आलम है तनहाई का
आज मुझे अहसास हुवा है अपनी शिकस्ता-पा-ई का


जुल्म

एक बार ख़ुदा भी देखे उन्हे तो दर्द से वोभी ची़ख उठे
इंसान के जो ज़ुल्म इंसॉ पे देख के चुप रह जाता हूं ।
- फिराक़


"आरुषीचा खून पित्यानेच केला" , "तीन तास ते निरज ग्रोव्हरच्या प्रेताचे तुकडे करत बसले". "बेगर्स होम मधल्या मृत्यचे काळेबेरे ?"

या साऱ्या बातम्या वाचल्या की फिराक़चा हा शेर आठवतो.

पखावज कचेरी

याच साठी केला होता अट्टाहास. प्रतिक्षा काय फक्त चातकच करतो ? Phd करत असणाऱ्या व बुधवुन, उत्तर प्रदेश येथुन आलेल्या संयोगीता सिंग पटेल यांनी निर्दोष पखावज वाजवुन साऱ्यांची मने काबीज केली.



कल के कलाकार संमेलन - दिवस ८ वा.

आता वाट पहाणे आजच्या तबला कचेरीची.

Friday, May 23, 2008

बेलाबहार - नविन गंधर्व

पण असे का ?

वडापाव व शौचालयाने भरलेली नेत्यांची मनोरंजन करणारी भाषणे ऐकायला फार मोठ्या संख्येने जमाव उपस्थित रहातात, आणि प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी गायब होतात ?
आपले कर्त्यव्य बजवायचे नाही मग नेत्याच्या नावे कोकलत रहायाचे। काल ठाणे मतदारासंघात लोकासभेच्या पोटनिवडणुकीत केवळ २६ % मतदान झाले।

Thursday, May 22, 2008

अनुराधा कुबेर, पुणॆ.

ना जानु बालमा मिले कब हु
पीत लगाके पछता रही ।
सखी मन लागेना ।



आधीच आपल्या माहेरचा कलावंताचे गाणे ऐकायचे या विचाराने राजाभाऊंच्या आनंदाला उधाण आलेल, त्यात परत त्या परमप्रिय बागेश्री राग गाणार म्हणजे काय ! सोन्याहुन पिवळे.

कधीकधी मला प्रश्न पडतो, रंगमंचावर गायलेले गाणे जास्त रंगत देते की कार्यक्रम सुरु होण्याआधी आतमधे कलावंत तयारी करण्यासाठी गातात ते गाणे ऐकणे जास्त बहरीचे असते ?
बढिया है ! दिल खुष हुवा !

कल के कलाकार संगीत संमेलन, दिवस ७ वा.
आता पर्यंत ऐकलेल्या बागेश्री पासुन याचे वेगळॆपण जाणवत होते. (कुणी तज्ञ मला हा फरक समजवुन सांगेल काय ? )

परमसौख्याचे, आनंदाचे, सुखाचे, समाधानाचे, दिवस कसे भरभरा भरभरा सरत रहातात, दुःखासारखे ते रेंगाळत का बरे रहात नाहीत ?

आज अनुराधा कुबेर खुपच छान गायल्या, पण केवळ २५ मिनीटॆच त्यांच्या वाट्याला होती. त्यामुळॆ ..

मन आज अतृप्ततेच समाधान मानतय.

अनुराधा कुबेर, पुणॆ.


ना जानु बालमा मिले कब हु
पीत लगाके पछता रही
सखी मन लागेना ।

आधीच आपल्या माहेरचा कलावंताचे गणे ऐकायचे या विचाराने राजाभाऊंच्या आनंदाला उधाण आलेल त्यात परत त्या परमप्रिय बागेश्री राग गाणार म्हणजे काय ! सोन्याहुन पिवळे. आता पर्यंत
ऐकलेल्या बागेश्री पासुन याचे वेगळॆपण जाणवत होते. कुणी तज्ञ मला हा फरक समजवुन सांगेल काय ?

कधीकधी मला प्रश्न पडतो, रंगमंचावर गायलेले गाणे जास्त रंगत देते की कार्यक्रम सुरु होण्याआधी आतमधे कलावंत तयारी करण्यासाठी गातात ते गाणे

कल के कलाकार संगीत संमेलन, दिवस ७ वा.

परमसौख्याचे, आनंदाचे, सुखाचे, समाधानाचे, दिवस कसे भरभरा भरभरा सरत रहातात, दुःखासारखे ते रेंगाळात का बरे रहात नाहीत ?

आज अनुराधा कुबेर खुपच छान गायल्या, पण केवळ २५ मिनीटॆच त्यांच्या वाट्याला होती.

मन आज अतृप्ततेच समाधान मानतय.

मुक्तांगण

दै. सकाळ च्या मुक्‍तांगणमधे बरेच जण आपला अनुभव लिहीत असतात. त्यापैकी काही वाचनात आले. परोपकार करतांना आपल्याला कसे कटु अनुभव येतात या संबंधी.

दुसऱ्या कोणासाठी असलेली लग्नाची आमंत्रणपत्रिका चुकुन त्यांच्या पत्त्यावर मिळाली, मग त्यांनी नावावरुन त्यांचा बरोबर पत्ता शोधुन काढुन त्यांना ती पत्रिका स्वःत नेवुन देण्याचे कष्ट केले तर त्या बदल्यात त्यांना खडुस वागणुक मिळाली

किंवा

पुढे गेलेल्या मोटरसायकल, स्कुटर वरील जाणाऱ्यांची धोकादायक परिस्थिती, उ.दा. हवेत तरंगणारा दुपट्टा जो चाकात जावुन अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही किंवा मागे बसलेले मुल, जो झोपी गेले असुन , दुलक्या खात खाली पडण्याची शक्यता असु शकते, हे पाहुन, जाणुन त्यांचा पाठलाग करत त्यांना थांबवुन, धोक्यापासुन सावध केल्या नंतर, करणाऱ्यांना मिळालेला वाईट प्रतिसाद इ.

परोपकार करणाऱ्यांना मिळालेल्या या अपमानास्पद वाईट वाटुन घेण्याचे कारण नाही. नाउमेद होण्याची गरज नाही.

एक तर आपण त्यांचा जीव वाचवला असतो किंवा आज आपण ही एक चांगली गोष्ट केली व या मुळे आपल्याला वाटणारे आत्मीक समाधान या उपेक्षापेक्षा किती तरी पटीने अधिक असते.

शेवटी आपण हे सर्व आपल्याकरता करत असतो, आपल्या मनाला या परिस्थितीचा त्रास होत असतो म्हणुन. आपण आपला चांगुलपणा सोडता कामा नये किंबहुना आपण केलेल्या या चांगल्या गोष्टी लगेचच विसरुन जायच्या असतात. ते करायलाच हव असत म्हणुन आपण केलेले असते.

सामान

"आपले सहप्रवास आपले सामान तर मागे विसरुन जात नाही आहेत ना ? लक्ष ठेवा." बस, ट्रेन मधील या सुचनेचा तंतोतंत अंमल माझ्या एका स्नेह्याने करायचे मनावर घेतले.
संध्याकाळी मुंबईहुन पुण्याला जाताना ट्रेन मधे त्याच्या बाजुला सरदारजींचा भला मोठाला ग्रुप बसला होता. लोणावळ्याला ते सर्व उतरले. एक बॅग मागे राहिली होती.
दोस्ताने मोठ्यामोठ्याने सर्वांना विचारले. "ये बॅग किसका है?"
एका सरदारजीला त्याने सांगितले, बहुदा तुमच्यापैकी कोणीतरी ही विसरुन गेलेला असावा. सरदारजीने ही असेल आपल्यापैकी कोणाचीतरी हा विचार केला व बॅग घेवुन तो खाली उतरला.
तळेगाव जवळ आले तसे बाजुच्या डब्यातुन एक प्रवासी आला. विचारु लागला.
"माझी बॅग कुठे आहे, येथे तर ठेवली होती, गेली कुठे ?
तेव्हा परोपकार करतांना जरा जपुनच.

जरासं वरती बघीतलं की

ते तुमच्यावर लक्ष ठेवुन आहेत बरं का ! रोजच्या धावपळीतुन वेळ मिळालाच व वरती पाहिले तर हे कळॆल.

Tuesday, May 20, 2008

शह आणि मात

संजुक्ता वाघ व जान्हवी वाडकर - कथ्थक

कल के कलाकार संगीत संमेलन- दिवस ५ वा

मात


हा गेम माझ्या हातुन केव्हाच निसटला होता. एवढी वाईट परिस्थिती असुन मी शेवटी जिंकलो. कदाचीत प्रतिस्पर्धी फारसा वेळ राहीला नसल्या मुळे तणावा खाली आला असावा. नाहीतर
White

RA1 -Check
B * R
QA3 - CHECK AND MATE

अद्वैता माने- पुणे - ओडीसी

Monday, May 19, 2008

"सिक्स्थ सेन्स’ सांगतो "लालच बहुत बुरी बला है रे "


श्री. विलास गावकर आता ’सिक्स्थ सेन्स ’ नावाचा सुसज्ज मॉल सुरु करुन जागतिक व्यापार विश्वात आपलं पदार्पण करीत आहेत.


’सिक्स्थ सेन्स ’ या वातानुकूलीत आणि अत्याधुनिक मॉलच्या तळमजल्यावर "व्हेज ऑलवेज" नावच रेस्टॉरण्टही सुरू केलं आहे. येथे कॉन्टीनेण्ट्ल, इंडीयन, चायनीज असं तिन्ही प्रकारच हेल्दी, चविष्ट फूड मिळेल. एखादं रेस्टॉरण्ट समोरुन कितीही स्वच्छ दिसतं असलं तरी त्यांच किचन मात्र अस्वच्छच असणार हे आपण गॄहीतच धरलेलं असतं. पण "व्हेज ऑलवेज"चं किचन अतिशय स्वच्छ व प्रशस्त आहे. विशेष म्हणजे इथे आलेला प्रत्येक खवय्या किचनमध्ये जेवण कसं तयार केलंजातं हे समोर लावलेल्या स्क्रिनद्वारे प्रत्यक्ष पाहूही शकतो आणि दुसरीकडे मॉकटॆल काऊण्टरवरुन आपल्या आवडत्या मॉकटेलचा आस्वादही लुटु शकतो.


वर्षारंभ विशेष, महाराष्ट्र टाइम्स मधे "विलास गावकर एक समर्थ व्यक्तीमत्व" या लेखात हे वाचल्या नंतर त्यांच्या विषयी आदराने मन भरुन आले. त्यात भर पडली ते उपहारगृहाचे वर लिहीलेले वर्णन वाचुन.

मुंबईत एखादे मस्त उपहारगृह सुरु झाले आहे आणि आपण अजुन त्याला भेट दिली नाही ? प्रभादेवी एवढाच उल्लेख वर्तमानपत्रात आला होता, तो धागा पकडुन राजाभाऊ सहकुटुंब सहपरीवार भोजन करायला निघाले. शोधत शोधत असे वाट पुसत पुसत , अरे मराठी माणसानी एवढे मॉल उभारले पण या परीसरातील कोणालाच काहीच ठावुक कसे नाही याचा विस्मय करीत दरमजल करीत अखेरीस परळ ऐस्टी डॆपो मागे, झेंडु फार्मसुटीकल समोर पोचले. आणि


न जेवता ही तृप्त होवुन ते परतले.


धन्य त्या वार्ताहराची. अजुन कशाचा कशाला पत्ता नाही. बांधकाम सुरु आहे, अर्धवट अवस्थेत सर्व काही आहे आणि त्या आधी तो पठ्ठाने आम्हाला चक्क जेवायला तेथे धाडले.

टॅक्सीचे बिल, झालेल्या मनस्तापाची भरपाईची रक्कम त्या वार्ताहराकडुन वसुल करायला हवी.

मी आणि माझी पुतणी.


बरे झाले देवा " मी आणि आमचा बाप " या विषयावर एक पुस्तक आधीच लिहुन झाले आहे .


जेव्हा परमेश्वर एखाद्यावर प्रसन्न होतो, मेहरबान होतो, तेव्हा तो त्याच्या घरात एका मुलीला पोटी जन्माला घालतो, घरातल्या सर्वांचे आयुष्य सुखद करण्यासाठी. घर प्रसन्न ठेवण्यासाठी, हसरे रहाण्यासाठी. आनंदी ठेवण्यासाठी, जीवनाला एक नवा अर्थ, परीमाण मिळवुन देण्यासाठी, तुमची काळजी घेण्यासाठी.


काका, मला सांग, घोडयाच्या पायावर कशी छडी मारतात न त्याला पळवण्यासाठी , तशी माझ्या पण पायावर मारायला हवी नं रे ! - दिवसभर माथेरानला चालुन चालुन थकलेली माझी पुतणी उवाच.


परमेश्वर काय सुख फक्त पोटीच जन्माला घालतो ?

वडापाव आणि शौचालय !

लोकसभेच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारातील मुद्दे कोणते तर वडापाव आणि शौचालय ! आता तस बघायला गेल तर खाणे व नैसर्गीक विधी यांचा जवळचा संबंध, पण म्हणुन काय निवडणुकीत त्याची चर्चा ? ते ही लोकसभेच्या ?

त्यात परत आपण अजुन वडापाव किती पिढ्या विकणार आहोत ? त्याने आता मोठमोठाली हॉटेल्स, उपहारगॄह उघडायला हवी, अगदी इंडीगो, दिवा महाराष्ट्राचा पासुन कोहीनुर पर्यतची.

केतकी जोशी - भरतनाट्यम

विजय तेंडुलकर

विजय तेंडुलकर नामक एका महान पर्वाचा आज अस्त झाला.

कल के कलाकार संगीत संमेलन- तिसरा दिवस.

देश, प्रांत आदी कोत्या मनोवॄत्तीच्या संकुचीत सीमारेखा येथे धुसर होत जातात, गळुन पडतात, कला आपल्या नाजुक हातानी हे पाश, ही कॄत्रीम बंधने हळुवारपणे दुर सारते, आणि मग श्रीलंकेवरुन आलेली वेरोनीका, कोलकाताचा सौवीक चक्रबोरती, सौरव रॉय, बंगळूर वरुन आलेले हरी व चेतना हे जोडपे, बनासथालील, राजस्थान वरुन आलेली भावना ग्रुव्हर, खडकपुरचा चंदन सिंग, आदी कलावंत, कथ्थक नृत्यशैलीत तर टेक्सास, अमेरीका वरुन आलेली पायल ओडीसीत, पश्चिम बंगाल मधील बरसात या ठिकाणा वरुन आलेला रहुलदेव मोंदल चक्क भरतनाट्यम शैलीत नॄत्य अविष्कार घडवुन आणतात. मुंबई-पुण्याकडच्या कलावंतांबद्द्ल तर काय विचारुन नका, ते तर साऱ्या शैलीत माहेर. त्यातही कथ्थक व भरतनाट्यम खास आवडीचे. (कोणीतरी, आपल्या भावनेच्या भरावर राजकारण करण्याची सवय झालेल्या नेत्यांना या अश्या कार्यक्रमांना जरुन घेवुन येणे ).


कल के कलाकार संगीत संमेलनाचा कालचा तिसरा दिवस. काल एक अनोखा नॄत्यप्रकार पहायला मिळाला. गुहाटीवरुन आलेल्या पल्लबी शर्माने सतरीया नॄत्य सादर केले. त्याची आलेली नशा उतरते न उतरते तोच द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग आपल्या ओडीसी नॄत्यात सादर करताना टॆक्सास वरुन आलेल्या पायल मिस्त्री ने बहार आणली. कालच्या सांयंकाळी देबश्रीता सेटी व प्रेमा लहीरी- भुवनेश्वर- ओडीसी, रहुलदेव मोंडाल- पश्चिम बंगाल -भरतनाट्यम, हरी व चेतना - बंगळूर -कथ्थक, भावना गॄव्हर - राजस्थान- कथ्थक, पुरवी भावे व कानेनीका निनावे - मुंबई- भरतनाट्यम आदी कार्यक्रम झाले.


खरी बहार आणली ती श्रीमती मनिषा साठे यांच्या शिष्या इशा देशपांडे, स्वरश्री देव, व मानसी गाडो या तिघींनी सादर केलेल्या कथ्थक नॄत्याने. आपल्या शिष्यांसाठी रंगमंचवर स्वःत उपस्थीत होत्या.

मी कॅमेरा म्यान करुन ठेवला. कलेचा विनापाश आस्वाद घेतांना त्याचा अडसर होतो.
आता प्रतिक्षा आजच्या सायंकाळाची.

Sunday, May 18, 2008

प्रज्ञा गोरे - मुंबई - भरतनाट्यम

मराठी माणसा जागा हो

माथेरान येथे गरज आहे ती मराठी माणसांनी, मराठी माणसांसाठी, मराठी भोजनाची सुयोग्य सोय करण्याची, रहाण्याची योग्य त्या दरात व्यवस्था करण्याची.

एवढे मोठे गिरीस्थान पण ! दरोरोज हजारो पर्यट्क येथे भेट देतात. पण धडकी जेवणाची सोय नाही, धड चांगल्या दर्ज्याची उपहारगॄह नाहीत. रहाण्यासाठी माफक दरात दर्जेदार हॉटेले नाहीत. M.T.D.C चे कॅन्टीन. सगळच आनंदीआनंद नेहमी सारखा.
महाराष्ट्रात मराठी पद्धतीचे जेवण मिळु नये या सारखी शोकांतीका नसेल . गुजराथी पद्धतीचे जेवण मुबलक प्रमाणात मिळते. थाळीचा दर , रु. १५० पासुन २००,३००, ३५० पर्यंत.
सर्वसामान्यांसाठी एक माणिकलाल टेरेस होते ते पण बंद पडले.

वेरोनीका दासनाईके - श्री लंका - कथ्थक

श्रीकला बेडेकर-मुक्ता मुळे - पुणॆ- कथ्थक

मनुष्याने मोहाला नेहमी शरण जावे


Saturday, May 17, 2008

माथेरान



राजहट्ट ,स्त्रीहट्ट, आणि बालहट्ट नको रे बाप्पा , परत त्यात स्त्रीहट्ट व बालहट्ट एकत्र येतात तेव्हा तर बोलायची सोय नाही.
काकाच्या पुतणीने गेल्या रविवारी केलेल्या जव्हार च्या सफरीत करवंदे खाण्यासाठी जीव काढला, ती काही कुठे मिळाली नाहीत, मग लिटील प्रिन्सेसला खास करवंद खावु घालण्यासाठी तिच्या काकीनी माथेरानचा बेत आखला.
माझा एक स्वार्स्थ ही त्यात होता, माथेरान म्हणजे भरपुन चालणे. फिटनेस की दुनीया मे नया कदम.

ओझे

जर या पृथ्वीलोकावर, मानव जाती ऐवजी इतर प्राणी प्रबळ झाले असते आणि त्यांनी मानवाच्या पाठीवर अशी जिवघेणी ओझी लादली असती व वर ढुंगणावर वेताच्या फोकानी फटके मारले असते तर ?


पण, On second Thought.

मानवही काही कमी नाही. त्याची इतर मानवाप्रती वागणुक मानवासारखीच असते.

केतकी जोशी, अरुंधती वर्तक - भरतनाट्यम- कल के कलाकार संमेलन

Friday, May 16, 2008

दुनिया झुकती है रे झुकाने वाला चाहीये


किंवा पैसा फेको तमाशा देखो. कोण म्हणते महागाई वाढली आहे ? गरीबीमुळॆ, कर्जबाजारीपणा मुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत ?


सहा सहा हजार रुपयाची तिकीटे काढुन सहकुटुंब सहपरीवार नवीन सर्कस बघायला माणसे जातात.


अजब तेरी दुनिया मेरे मालीक.


कल के कलाकार संमेलन- दिवस पहिला






Thursday, May 15, 2008

हे ना लाभे सौख्य तेथे !



शिक्षण, नोकरी व्यवसायानिमीत्ते अनेक माणसे स्थलांतर करतात, मुंबई सोडुन कोठे कोठे जावुन रहातात अगदी अगदी चक्क पुण्याला देखील .

हा समुद्रकिनारा, या किनाऱ्या लगतचा तो वॉक, या सौख्याला ते नक्कीच दुरावतील.

सोअम




एवढ्या मोठया उपहारगॄहात भोजन करायाला जायचे आणि तेथे जावुन काय तर चक्क पत्रावळीवर जेवायचे ! जळ्ळले मेले ते लक्षण !

माझी म्हातारपणीची काठी (की सोटा ते काळच ठरवेल ) पुण्याला गेला होता. वरळीला कॉपर चिमणी मधे दोघां साठी टेबल आरक्षित केले रात्रीच्या जेवणासाठी. विचार केला आज तिला अवचीत चकीत करु. सायंकाळी कुलाबा उपवन मधे चालता चालता बेत जाहीर केला. पण रस्तात टॅफीक जॅम मधे हळु हळु बेत विस्कटत जावु लागला. मन मागे खेचु लागले, ते उत्तरेकडचे मसालेदार, चमचमीत, तेलकट पदार्थ नकोसे वाटायला लागले. त्यात परत केलेले अनेक निश्चय. मग आता पुढे काय ?

जिथे रुचकर, मधुर, आनंददायक, नाजुक, चविष्ट, रसनेंद्रियांना तॄप्त करणारे असे पदार्थ मिळतील अश्या ठिकाणी जाण्याचा विचार प्रबळ होवु लागला आणि आठवेले ते बाबुलनाथ मंदिरासमोर असलेले ’सोअम’. गुजराती, मारवाडी पद्धतीचे पदार्थ मिळणारे उपहारगॄह. शुद्ध शाकाहारी(?)

आधी जरा किंचीतसा विरोध होता, पण आमरसचे प्रलोभना पुढे तो ढासळत गेला.

सुरवात केली, अमिरी खमण नी, मग पुढे आली डाल ढोकली. ती संपते न संपते तर कॉन पानकी, मस्त पैकी केळीच्या पानात शिजवलेल्या. मस्त मुड बनता चला गया .

मुख्य जेवणासाठी मागवले अलिशान मेथी पिठले आणि भाकरी, आमरस व फुलके लालबटाट्याच्या भाजी सहीत.

मग तिने शर्कराविरहीत डायट (?) आयक्रीम वर सांगता केली.

आणि हो , ह्या साऱ्यांची पेशकश छानश्या पितळी थाळ्यां, वाट्यांमधुन केली जाते.

वेगवेगळ्या प्रकारच्या पानकी खावी तर येथेच. कॅलरी बाबत सावध असणाऱ्यांसाठी तर येथे खास विचार केला आहे. खास त्यांच्या साठी पावभाजी देखील मिळाते.

गट्टॆ का साग, डाल बाटी चुरमा, पुरण पोळी, मसाला फडा खिचडी, मुग डाल खिचडी, पुढच्या खेपेसाठी. केसर जिलेबी, गरम मोतीथाळ, मुगडाळ शिरा, श्रीखंड, आदी पदार्थ नुसते वाचण्यासाठी व आठवण्यासाठी.

सुखाला दुःखाची एक किनार असते, काल मी नजर चुकवुन एकटाच गेलो, व अप्पम चटणी, मागवले. हा पदार्थ येथे मागवल्याचा पश्चाताप झाला. पानकीच मागवायला हवी होती.

मै इधर जावु या उधर जावु ?

हाय राम ये कैसी पहेली है ! कही भी जावु , तलाक तो मिलना ही मिलना है !
क्या उनकी घुस्सेसे मै दुर रह पाउंगा ? क्या मै अपने आपको बचा सकुंगा ? फिलहाल यह तो नामुमकीन नजर आ रहा हे ।
उद्या व परवा, चव्हाण सेंटर मधे सहा तरुण गुणी कलाकारांचा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आहे. त्याला जायचयं. धर्मसंकट असे की उद्या पासुनच मुंबई विद्यापिठ भवन, सी रोड, चर्चगेट ला ’कल के कलाकार’ संमेलन सुरु होत आहे. हे संमेलन जवळ जवळ दहा दिवस असणार आहे. म्हणजे दहा दिवस मी घराच्या बाहेर. सुरवातीस शास्त्रीय नॄत्याचे कार्यक्रम असतात, ते चुकवुन कसे चालेल ?
त्यात भरीस भर म्हणुन N.C.P.A. मधे उद्याच व्हायोलीन जुगलबंदीचा कार्यक्रम आहे.
वर ताण म्हणजे तीन दिवस लागोपाठ सुट्या आल्यामुळे, पुण्याला ही पळ काढायचा आहे, टिकीटे आधीच आरक्षित करुन झाली आहेत.
परमेश्वरा, दिनदयाळा, माझे पाच क्लोन तयार करतोस का रे ?

Tuesday, May 13, 2008

दोन फुल एक हाफ

कॉलम लिहावा तर तंबी दुराईनेच.

११ मेच्या लोकरंग मधे मराठी माणसांबद्द्ल तंबी दुराई म्हणतात की .

"सभा संपवुन परतणारे माराठी बंधू, माता आणि भगीनी सगळे खात्यापित्या घरचे दिसत होते. मी सटवाईला म्हटलं ’यांच्या भाषेचा आणि संस्कॄतीचा काही प्रॉब्लेम दिसत नाही. मग हे आकांडतांडव कशाला ? सटवाईनं माझ्या डोक्यावर एक टपली मारली आणि म्हणाली. पॄथ्वी आपोआप आणि आपल्या ठरलेल्या गतीनं फिरते, हे ठावुक आहे ना तुला ? "

मी म्हटलं ’हो. पण त्याचा इथं काय संबंध ? ’

फिरत असलेल्या पॄथ्वीवर हात ठेवून उभं रहायचं आणि म्हणायचं, मी फिरवतोय या पॄथ्वीला. मी हात काढला की पॄथ्वी थांबेल आणि सगळं नष्ट होईल! तर असा पॄथ्वीवर हात ठेवुन कॉन्फिडन्टली काहीही न करता जो उभा असतो तो राजकारणी नेता ! आणि त्यानं घातलेल्या खोट्या भितीमुळे घाबरलेले असतात ते सामान्य नागरीक. बुद्धीवंतांचा समावेश ही अखेर सामान्य नागरीकांतच होत असतो, हे लक्षात ठेव !’

LOCAL MARKET RECAP

Yesterday good demand from oil companies along with couple of corporate pushed the spot Indian rupee to break another crucial level of 41.80/USD.

The pair finally closed at 42.04/USD.

Today INR is expected in range of 41.90/USD-42.20/USD

EUR/INR- 65.236
GBP/INR- 82.032
JPY/INR- 0.4049
CHF/INR- 40.236
AUD/INR- 39.5

Monday, May 12, 2008

टोल वसुली नाके

नाणे घाटात सातवाहनाच्या काळातले टोल वसुली ची जमा झालेली रक्कम ठेवण्यासाठी असलेले रांजण अजुनही आहेत.

काळ बदलला. २१ वे शतकात त्याने प्रवेश केला. पण टोल वसुलीची संकल्पना किंबहुना पद्धत मात्र आपल्याकडे अजुनही मागासलेलीच राहीली आहे.

या विधानाची खात्री करुन घ्यायची आहे.

रविवारी रात्री घोडबंदर वरुन दहीसर चेकनाका प्रवास करा. १५-२० मिनीटाच्या अंतराला दोन दोन तास कसे लागतात याचा अनुभव घ्या.

जग केव्हाच पुढे निघुन गेले.

आपण हा टोल नक्की कशासाठी देत आहोत ? योग्य कारणासाठी, योग्य रक्कम देत आहोत ना ? आपल्या या प्रवासात नक्की किती ठिकाणी टोल नाके आहेत ? किती वेळा रांगेत टोल भरण्यासाठी ताटकळत उभे राहायचे ? एकाच जागी सारी रक्कम का गोळा केली जात नाही ? या रक्कमेचे नक्की काय होते ? परदेशासारखी वसुलीची पद्धत आपल्या कडे का नाही ? असे फालतु प्रश्न स्वःताला विचारुन उगाचच डोक्याला शीण देवु नकात.

मुकाट्याने वाहतुकीच्या कोंडीतुन बाहेर सुटण्याचा केविलवाणा प्रयत्न करत रहा.
या हालात भर पडली आहे ती टोलनाक्याच्या जवळाच असलेल्या मॉल कारणॆ. याला भेट देणाऱ्यांच्या मुळॆ या परिसरात पडलेल्या वाहतुकीच्यावरील अतिरीक्त ताण पडला आहे.

पाण्याचे पारंपारीक स्त्रोत्र

कोणॆ एके काळी राजा याचे पाणी पीत असावा आणि आता ?

जुना राजवाडा

खंडहर यह कह रहे है की इमारत कभी बुलंद थी

लाचारी



सरत्या काळातली ही लाचारी खुप अस्वस्थ करुन सोडते.

जव्हार, विक्रमगड व दाभोसा धबधबा


खाजगीतुन फर्मान निघाले, आज स्वारी करायची जव्हारवर. मग काय मना करण्याची काय बिशाद आहे या पामराची. हुकुम शिरसावंद.


अतिलाडाने, अतिपरीचयाने, अतिश्रीमंतीने बिघडलेली बाजारु माथेरान, खंडाळा-लोणावळा व महाबळेश्वर या गिरीस्थानांच्या पलीकडेही जग आहे. हे जग नयनरम्य, सुंदर, शांत, निसर्गरम्य, असुन साऱ्या मानवी कोलहालापासुन, गजबटापासुन,लुटालुटीपासुन दुर आहे. ते जव्हारला आहे.


आता गरज आहे ती चैनीच्या साचेबंद कल्पनांमधुन मुक्‍त होण्याची. वेगळी वाट धारायची.

डहाणु जवळील चारोटी फाट्याजवळ असलेल्या महालक्ष्मीचे दर्शन घेवुन, जव्हारच्या रस्ताला लागलेले लागले की एक वेगळीच अनुभुती येवु लागते, आपण वेगळ्याच विश्वात प्रवेश करतो. हा रस्ता खुप देखणा आहे. दुतर्फा आलेल्या जंगलातुन प्रवास करत आपण केव्हा विनाशीण पोहोचतो ते कळतच नाही. वाटॆत भेटणाऱ्या सुर्या नदीवर धामीणी गावाजवळ तसेच कवडास गावाजवळ धरणे आहेत. तेथे थांबावे, क्षणभर. डोळे भरुन नदीचे दर्शन घावे व पुढे निघावे.


जव्हार मधे सनसेट पॉईंट जवळ रहाण्यास व जेवणास एक छानसे रिसॉर्ट आहे. तेथे मुकाम करुन मग जवळील जयसागर धरण बघायला जावे. घनदाट जंगलातील एक लहानुशी पायवाट या छोटेखानी धरणाकडॆ घेवुन जाते. येथेल्या झाडांवरची जांभळे, आंबे पाडुन किंवा रखवालदाऱ्याच्या सौजन्याने मिळवावीत, खाली तलावाकाठी गर्द झाडीत निवांत पहडुन त्यांचा आस्वाद घेण्यासारखे सौख्य नसावे.

रम्यपणा, शांत पणा तो तरी किती ! काम काय तर एकच. Listen the silence of the nature.

सकाळी हनुमान पॉइंट वर जावे, दुरवर पसरलेला परिसर पाहात बसावे. मग भग्न अवस्थेतला राजवाडा पाहाण्यास जावे, आपल्या पर्यटनखात्याच्या, सरकाराच्या निष्काळजी, बेपर्वा वृत्तीने हळहळत, राजस्थान मधल्या चांगल्या अवस्थेतील पॅलेसची ह्या पडक्या वाडा चिरेबंदीशी तुलना करत दुःखी होत परतावे.


परत येतांना आम्ही दुसरा रस्ता पकडला, विक्रमगड मार्गे परतलो, येथे दिवेकरांचे ’नेचर ट्रेल’ नामक सुंदर रिसॉर्ट आहे त्याला धावती भेट दिली. बर झाले हा रस्ता धरला. मस्त रस्ता आहे. परत परत जाण्यासारखा आहे आणि पावसाळ्यात तर खासच.
पावसाळ्यात मुद्दामुन वाकडी वाट करुन जाण्यासारखे, देहभान विसरुन जाण्यासारखे एक अप्रतीम स्थळ या भागात आहे. अगदी अगदी गिरीसप्पाचा धबधबा देखील विसरुन जाता येईल असे. त्याचे नाव आहे दाभोसा धवधबा. जव्हार पासुन १४-१५ कि..मी. येवढ्याच अंतरावर हा आहे. अलीकडेच येथे दिवेकरांनी रिसॉर्ट काढले आहे.
परतांना पुढे दुसरा रस्ता पकडला. Cross Country Driving. - मनोर-पालघर- माहीम-केळवे-सफाळे-तांदुळवाडी. हा रस्तापुढे वरईला हमरस्तावर मिळतो. अतिशय सुंदर हा रस्ता आहे. श्रावणात तर बघायलाच नको.




Saturday, May 10, 2008

मंगळ चंद्र पिधान युती


भारतात या वेळी , रात्री १० वाजताच्या सुमारास आपण हा बॉग वाचत असाल, तर आपण एका सुंदरश्या मनवेधक , मनोहरी दृश्याला मुकत असाल. वेळ न दवडता पश्चिमेकडील खिडकी, गच्ची जेथुन चंद्रदर्शन होत असेल तेथे जा, आज मंगळ व चंद्र यांची पिधान युती आहे. चंद्राच्या अतिशय निकट 4 o'clock position ला मंगळ दिसतोय.
हे फोटो मी काढले आहेत

बॉगर्स कसे आहात ?

आपल्या बॉगचे नाव व आपला ई मेल पत्ता, शहर, मला कळवाल का ?
मुंबई-पुणे स्थित मराठी व हिंदी मधे बॉगवर लिखाण करणाऱ्यांची माहीती मी संकलीत करतोय. त्यांनी कोठेतरी , कधीतरी या नव्या प्रभावी माध्यमाबाबत विचारविनीमय, माहिती व ज्ञानाचे आदानप्रदान, तसेच या प्रकारास योग्य ती दिशा देण्यासाठी एकत्र यावे या दृष्टीकोनातुन.
उ.दा. आजच्याच लोकसत्तामधे एक बातमी आहे. "भारतीय वेबविश्वात शह-काटशह - गुगलच्या ’यु ट्युब ला याहू! ’ग्लू पेजेस’चे उत्तर "
तर अश्या या कंपन्यांकडुन आपण बॉगर्स आपल्याला जसे हवे ते सोयीचे तंत्रज्ञान, मराठी unicode , भारतीय भाषेतले scripts वगैरे वगैरे अधिक चांगल्या रितीने मिळवु शकतो.

प्रिय महापौर शुभा राउळ

प्रिय महापौर,

आपल्या साऱ्या समाज प्रबोधनाच्या स्तुत्य प्रयत्नात आम्ही सारे सुजाण नागरीक आपल्या बरोबर आहोत.


बातमी एक. पण त्यांचा सुर वेगवेगळा. एक सकारात्मक एक नकारात्मक.

महाराष्ट्र टाइम्स -

महापौर डॉ. शुभा राऊळ यांनी अचानक चर्चगेट येथील हुक्का पार्लरला भेट दिल्यामुळे आरामात हुक्का ओढत बसलेल्या तरुणांची चांगलीच धावपळ उडाली! शहरात हुक्का पार्लरची संख्या वाढत असून मोठ्या संख्येने तरुणवर्ग अशा पार्लरांकडे आकषिर्त होऊ लागले आहेत. सुरुवातीला स्ट्रॅाबेरी किंवा इतर फ्लेवरचा हुक्का ओढणारी मुले सवयीच्या अधीन झाल्यानंतर आपसुकच तंबाखू भरलेला हुक्का ओढू लागतात. हुक्का पार्लरवर कारवाई करणे पालिकेच्या नव्हे तर, राज्य सरकारच्या अखत्यारीतील बाब आहे. परंतु, हुक्का पार्लरपासून तरुणांनी दूर रहावे या उद्देशाने महापौरांनी शुक्रवारी चर्चगेटच्या मोक्का पार्लरला भेट दिली. त्यांच्यासमेवत उपमहापौर विनोद घेडिया, आरोग्य समितीच्या अध्यक्षा शुभदा गुडेकर व पालिकेच अधिकारी होते. या पार्लरवर कारवाई करण्यासाठी सरकारला विनंती करण्यात येणार असल्याचे महापौरांनी सांगितले.

त्या विरुद्ध आजचा लोकसत्ता.


महापौरांची आता हुक्काविरोधी मोहीम


’हुक्काच्या आहारी गेलेल्या तरुणांविषयी महापौर शुभा राउळ यांना चिंता वाटत असून, या व्यसनापासून परावृत्त होण्यासाठी तरुण पिढीचे प्रबोधन करण्यासाठी महापौरांनी आज ’हुक्का’ मिळणाऱ्या एका हॉटेलला भेट दिली. मात्र महापौरांच्या या प्रबोधन मोहीमेकडे कोणीही लक्ष न दिल्या मुळे या एकाच हॉटॆलमधून महापौरांनी आपली ’समाज प्रबोधन ’ मोहीम आटोपती घेतली. त्या वेळी हॉटॆलात बऱ्यापैकी गर्दी होती. त्यापैकी काही तरुणांशी बोलण्यचा प्रयत्न महापौरांनी केला, मात्र त्यंच्याशी फारसे कोणी बोलले नाही. महापौरांनी त्यांना ’असे करु नका’ असे आवाहन केले. त्या नंतर महापौरांनी इतर ठिकाणी जाण्याचा बेत रद्द्द केला.

एस्प्रेस वे वरील वहानांचे वाढते अपघात

हमरस्तावरील, एस्प्रेस वे वरील वहानांचे वाढते अपघाताचे प्रमाण पाहीले की आपण सुरक्षतेच्या बाबत किती बेफिकीर असतो हे जाणुन खंत वाटते.

अतीश्रमीत, पुरेशी विश्रांती न घेतलेले , सुरक्षतेच्या नियमांचे प्राथमीकही ज्ञान नसलेले, बेफिकीर ,स्वःताच्या व इतरांच्या जीवनाबद्द्ल आदर न बाळगणारे, चलता है ही वृत्ती बाळगणारे, उतावळे, बेशिस्तीने , बेदरकारपणे सुसाट वेगाने गाडी हाणणारे वाहान चालकच सर्वस्वी या दुर्घटनेस जबाबदार असतात.

एस्प्रेस वे वर तर अवघड वहाने बिनधास्तपणे उजव्या लेन मधुन चालवतांना सरास आढळातात. बाजुला होवुन मागच्याला पुढे अजिबात जावुन देत नाहीत, मग मागच्याचा तोल जातो. चुकीच्या पद्ध्यतीने रागात तो गाडी पुढे काढायला बघतो. अपघाताला हे तर निमंत्रण.

वहान चालवण्यासाठी परवाना देतांना वास्तवीक पहाता सुरक्षततेच्या सर्व नियमांची चांगलीच ओळख यांना संबधीत खात्यांनी करुन द्यायला हवी, या साठी चागंले दोन-तीन तासाचे वर्ग असावेत, चाचणी परिक्षाही असावी, पास झालात तरच परवाने दिले जातील ही अट असावी. पण ? तुम्हाला गाडी निर्दोष काय अगदी चालवता जरी येत नसली तरी परवाने मिळु शकण्याच्या जमान्यात हे कठीणच आहे.

मुंबई वरुन सुमो भाड्याने घेवुन पुण्याला व तेथुन महाबळेश्वरला. आम्ही त्यांचे पाहुणे. . सकाळी पुण्यावरुन निघुन महाबळेश्वर व संध्याकाळी परत.

एस्प्रेस वे वर अती वेगात चालवणे व सतत डाव्या बाजुने गाडी पुढे अगदी बोगद्यात सुद्धा काढण्याच्या चालकाचा सवयी वरुन आधीच माझी व त्याची जुंपली, अनेकदा चांगल्या रितीने सांगुनही, पालथ्या घड्यावर पाणी. त्यात त्याच्या गावाला कोणीतरी गेले, मग त्यांला गावावरुन येणारे सारखे मोबईल फोन. वरताण म्हणजे गाडीच्या मालकाचा सतत येणारा मोबाईल फोन, रातोरात सिल्वासाला जाण्यासाठी नवीन भाडे आलेले आहे, गाडी लवकर घेवुन ये व त्यांना घेवुन जा.

शर्त झाली. महाबळेश्वर वरुन गाडी चालवत आणणारा चालक ( तरी मधे दर दोन-अडीच तासाने मी त्याला थांबायला लावत होतो) आता यापुढे रात्री सिल्वासाला जाणार, त्यात मयतीचे टेन्शन, तिथुन तो गावाला जाणार.

तळोजाला अपघात होता होता टळला. शेवटच्या क्षणी.

सोमवारी म्हात्रे पुल, पुणे ते सायन, मुंबई ,प्रवासाची वेळ फक्त दोन तास. स्कॉर्पीयो गाडी. मी परत त्यात पाहुणा. आमचे चालक तंबाखुच्या तारेत गाडी चालवत होते. चालवता चालवता मधेच खिशातुन तंबाखुची पुडी काढायची तोंडात तोबारा भरायचा, अचानक चालत्या वेग कमी करुन गाडीचे दार उघडुन पिक मारायची. देवा रे अगुन मी जीवन धडपणे जगलेलो नाही रे, थोडीशी मला मुदत दे. देवाचा धावा चालु.
अहो सेफ्टी बेल्ट लावा,
जमत नाही, अडकल्यासारखे होते,
अहोपण आपल्या सर्वांच्याच भल्याकरता तो आहे.
जरा वेग कमी करा. 140 -160 वेग धोकादायक.
प्रतिक्रिया शुन्य.
उजव्या रांगेतुन चालवु नकात, ती रांग फक्त ओवरटेक करण्यासाठी आहे,
प्रतिक्रिया शुन्य.

सारखे सारखे बोलु नकात, रस्तावर लक्ष द्या
तुम्ही गप्प बसा हो. त्यांना त्रास देवु नकात. - मला फायरींग मिळाले.
अहो पण हे बॅकसिट ड्रायवींग नाही, मी सुरक्षततचे प्रशिक्षण घेतलेला माणुस आहे.
धडा. शिवनेरी व महाबसनेच प्रवास करावा.

Friday, May 09, 2008

काण्या अजुनही जास्त नर्व्हस

बस मधे जेष्ठ नागरिकांसाठी राखीव असलेल्या जागेवर बसलेल्या तिने उठुन चक्क काण्याला बसण्यासाठी जागा दिली.

काहीतरी करायलाच हवे.

हा खेळ सावल्यांचा


रेसच्या घोड्यासारखे धावते वजन कमी करणॆ हा एकमेव ध्यास घेतलेले, आज महालक्ष्मी रेस कोर्स वर. सायंकाळी

मंत्रालय परिसर

सध्या या परिसरात तामण नुसता बहरुन राहीलाय. केवढी या परिसरात आंब्याची, जांभळाची झाडे आहेत.

योगक्षेम
पेट्रोलीयम हाऊस

केवळ या पट्टात चालायला मिळाव म्हणुन सारा अट्टाहास

काण्या खल्लास

एका कार्यशाळेस दोन दिवस गेलो होतो. सुरवात "First Impression" या विषयाने झाली. भाग घेणार्‍यांनी आपले एकामेकांबद्द्ल प्रथमदर्शी काय मत झाले हे सांगायचे होते.
मला बघुन एकीने सांगीतले " Fatherly Figure "
अरे देवा, काय काय ऐकायला लागतय ? आतापर्यंत पुण्यामधे सगळे काका म्हणायला लागले, तेव्हा ही तर पुणेरी लोकांची पद्धतच आहे करत मनाला समजवले,
पण आता तर ?
बायकोला सांगीतले तर ती, खो खो हसायला लागली, मुलाला, पुतणीला बोलावुन आपल्या बिचाऱ्या नवऱ्याची मजा सांगु लागली.
कर कर, तु पण नवऱ्याची मस्करी कर.

है सबसे मधुर गीत वही जो हम दर्द के सुर मे गाते है !

परमेश्वराने धरतीवर मनुष्याला जन्माला घातले, त्याला एक दिल दिले, दिलाचा दर्द दिला आणि तो दर्द सुसह्य करण्या़साठी, त्यावर हळुवारपणॆ फुंकर घालण्यासाठी हळुच एक मुलायम, मखमली आवाज पाठवुन दिला.

तलत महंमुद ची आज १० वी पुण्यतिथी.

त्यानी सादर केलेला आपल्या शेवटच्या कार्यक्रमाला मी ष्णमुखानंद हॉल मधे गेलो होतो, त्याची अवस्था पाहुन खुप वाईट वाटत होते, कंपवाताने थरथरत असलेल्या तलत ने गायला सुरवात केली व परत त्या जुन्या, सोनेरी आणि सुरेली जमान्यात सर्वांना तो घेवुन गेला.

काही दुष्टप्रवॄत्तीच्या माणसांनी या कार्यक्रमात हुल्लडबाजी करण्याचा प्रयास केला पण आम्हा तलतप्रेमींनी तो हाणुन पाडला.

माकडांना काय रत्नांचे मोल ?

Thursday, May 08, 2008

प्रतिक्रिया

आज या दोघांचे बॉग पाहिले.
केवढया प्रतिक्रीया येतात यांच्या बॉगवर ! मला त्यांचा हेवा वाटतो.

Wednesday, May 07, 2008

आंबा महोत्सव




सकाळ झाली, मोरुच्या बायकोनी मोरुला हाक मारली. मोरु, लवकर ऊठ, व चटदिशी तयार हो पाहु, आज अक्षय तॄतीया.

होणाऱ्या संभाव्य खर्चाचा अंदाज घेत मोरु डोक्यावर पांघरूण घेवुन झोपेचे सोंग घेवु लागला, मनाशी काहीतरी ठरवत. सोन्याहुन पिवळे, महाग व दुर्लभ्य, दुर्मीळ गोष्ट जी कोणती असेल ती आज आपण आपल्या बायकोसाठी आणुन तिचे दिल जिंकायचे. बस्स ठरले. ठरले म्हणजे ठरले. आता माघार घेणे नाही.

साहेब ले लो, अच्छा क्यालिटीका है ! एक नंबरी. देवगड का है !!

हल्ली बाजारात भैय्यांचा सुळसुळाट झाला आहे. घरोदारी, रस्तावर खोके घेवुन फिरत असतात. रत्नागीरी , अलिबाग, देवगड, आझमगढ, अमरावती, नागपुर, त्यांना काय सर्वच सारखे. नगास नग असल्याचे कारण. असली काय नी नकली काय ? विकत घेणाऱ्यालाही त्यातल्यात्यात समाधान.

अस्सल, सुवासीक, रुचकर, माधुर्ययुक्त, केसरीया आंबा खायचा असेल तर थोडी प्रतिक्षा करायला हवी. फळांच्या राजाला, राजाच्याच रुबाबात, ऐटीत राजासारखे खायचे असेल तर आम्रमहोत्सवाला जावुन देवगडच्या बागाईतगारांकडुन, त्याच्या घरचे कच्चे आंबे खरेदी करुन , आढी लावुन , उतावळेपणा न धरता, ते नैसर्गीकरित्या पिकले गेल्यानंतर मग त्याचा आस्वाद घेण्यावाचुन अजुन दुसरा कोणाताही पर्याय उपलब्ध नाही.

सध्या मुंबईत दिनानाथ दलाल मैदान, पोर्तुगीज चर्च च्या बाजुच्या गल्लीत, दादर येथे येथे आंबा महोत्सव भरला आहे.

दरवर्षी या निम्मीत्ते, आंबा उत्पादक व आपण यांची थेट गाठभेट घालुन देण्याच्या या स्तुत , उत्तम उपक्रमाबद्दल त्यांचे आभार. या कार्याकरीता तरी त्यांचे शहरभर भलेमोठाले बॅनर्स लावण्यास कोणाची ही हरकत नसावी.

Tuesday, May 06, 2008